नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात सन 2007 मध्ये पोलीस झालेले ज्ञानेश्र्वर कज्जेवाड यांचे लातूर जिल्ह्यात अपघाती निधन झाले आहे. नांदेडमधील त्यांच्या मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे.
सन 2007 मध्ये लातूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले ज्ञानेश्र्वर नारायण कज्जेवाड हे नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर रुजू झाले होते. त्यांचे मुळ गाव वडगाव (एक्की) ता.चाकूर जि.लातूर असे आहे.काल दि.3 ऑक्टोबर रोजी एका अपघातात ज्ञानेश्र्वर कज्जेवाड यांचे निधन झाले. आज सोमवार दि.4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता वडगाव (एक्की) ता.चाकूर जि.लातूर येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत. नांदेड जिल्ह्यात भरती झाल्याने त्यांची बरीच मित्र मंडळी नांदेड येथे आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
