क्राईम

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाने तीन जणांना जखमी केले

नांदेड(प्रतिनिधी)- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीने मुखेड जवळ तीन जणांना उडवल्याचा प्रकार घडला आहे. यात एक पोलीस अंमलदार आहे. धडक देणारी गाडी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आलेल्या पत्रकारांची आहे. कारण त्या गाडीवर प्रेस-4 असे लिहिलेले आहे.
काल नांदेड जिल्ह्यात आलेेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजही कांही भागातील पूरपरिस्थिती पाहण्यासाठी जात असतांना बेरळी ता.मुखेड येथील एका वळणावर माजी मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील गाडी क्रमांक एम.एच.26 बी.सी.8 या गाडीने तीन जणांना उडवले त्यामध्ये एक पोलीस आहे. माजी मुख्यमंत्र्यांचा हा ताफा गडगा ते मुखेड असा प्रवास करत होता. बेरळी येथे राजे छत्रपती ऍकडमीजवळ हा अपघात घडला. अपघातात जखमी झालेल्यांची नावे बालाजी शंकरराव पवार (26) रा.मांजरी ता.मुखेड, राजेश व्यंकटराव जाधव (36) रा.मुखेड आणि नामदेव सायन्ना दोसलवार हे पोलीस अंमलदार आहेत. जखमींवर मुखेड रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. धडक देणारी गाडी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आलेल्या पत्रकारांची आहे. कारण त्या गाडीवर प्रेस-4 असे लिहिलेले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *