नांदेड

बेकायदेशीर नियमावलीनुसार शेतकऱ्यांवर अन्याय-देवेंद्र फडणवीस

नांदेड(प्रतिनिधी)-आज सरकारमध्ये असलेली मंडळी आम्ही सत्तेत असतांना पिक विम्यासाठी मोर्चे काढत होती, विमा कंपन्या फोडत होती. ज्यावेळी आम्ही कुठे 800, 600, 400 कोटी रुपयांचा विमा दिला होता. बेकायदेशीर नियम बनवून त्या आधारावर पंचनामे बनविण्याचा डाव चुकीचा आहे. हा शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे. नजर आनेवारीमध्ये नुकसान 90 टक्के दिसते तर ते 35 टक्के सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता शेतकऱ्यांना तातडीने मदत घोषित करण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टी भागातील पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस नांदेडला आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सोयाबीन 100 टक्के नुकसान झाले आहे. इतरही पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आम्ही सरकारमध्ये असतांना ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नव्हता त्यांनी पिक विमा भरला आहे असे समजूनच त्यांना सरकारने अर्धी मदत दिली होती. राज्य सरकारने कांही पिकांना विम्याची सवलत ठेवली नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. आता सरकारने सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे. आम्ही सरकारमध्ये असतांना एनडीआरएफ कायद्याच्या बाहेर जावून मदत दिलेली आहे. राज्य सरकारने जाणीवपुर्वक वैज्ञानिक विकास मंडळाचा मुडदा पाडला. आज वैज्ञानिक विकास मंडळ अस्तित्वात नाही. उद्योगांना दिलेली विजेची सवलत परत घेतली. आमच्या काळात कधीच आम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले नाहीत. आज विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन कापले जात आहेत.
प्रत्येक्षात शेतकऱ्यांना किती पैसे मिळावे यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे काही घोषित झाले आहे ते तर शेतकऱ्यांना द्या आमचा असा कांही दावा नाही. आजच्या  मुख्यमंत्र्यांनी 50 हजारांच्या मागण्या केल्या आहेत, फळबागांसाठी दीड लाखांच्या मागण्या केल्या आहेत. आमचा असा कांही दावा नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना अत्यंत केवीलवाणी विनंती करत हात जोडून सांगितले आहे की, आपल्या त्रासासाठी आत्महत्या करून तो व्यक्त करू नका आम्ही सर्वोपरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठामपणे उभे राहु.
या पत्रकार परिषदे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर,आ.राम पाटील रातोळीकर,  आ.राजेश पवार,आ.डॉ.तुषार राठोड, चैतन्य बापू देशमुख, प्रविण साले, प्रविण पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

लेखक द.मा.मिराजदार यांच्या निधनाबदल दु:ख व्यक्त करतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठी साहित्याचे या घटनेमुळे मोठे नुकसान झाले आहे. मराठी साहित्य संमेलनाचे  अध्यक्ष द.मा.मिराजदार हे मराठी साहित्यसाठी एक अमुल्यरत्न होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.