क्राईम

इंदूरीकर आत्महत्या प्रकरणातील एक गुन्हेगार औरंगाबाद येथे पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-तरोडा भागात इंदूरीकर यांनी केलेल्या आत्महत्ये प्रकरणातील आणि लोकांना सरकारी नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या एका ठकसेनाला भाग्यनगर पोलीसांनी औरंगाबाद येथून मोठ्या नाट्यमयरित्या पकडून आणले आहे. पोलीसांनी त्याला पकडले तेंव्हा तो मी पत्रकार आहे असे सांगत होता.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 136/2021 दाखल आहे. त्यात इंदोरीकर यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार आहे. या सोबतच गुन्हा क्रमांक 278/2021 मध्ये अनेकांनी अशी तक्रार केली होती की, सरकरी नोकरी लावतो म्हणून फसवणूक झाली आहे. या फसवणूकीत संतोष जामनीक हा एक आरोपी आहे. त्याच्यासोबत अनेकांनी सरकारी नोकरीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली.भाग्यनगर पोलीस ठाण्यात सध्या तात्पुर्ती नियुक्ती  पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांना देण्यात आलेली आहे. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सुधाकर आडे आणि पोलीस अंमलदार रितेश कुलते यांना 27 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. संतोष जामनीक याचे मागील सहा महिन्याचे मोबाईल लोकेशनवरून औरंगाबादचा पत्ता लागला होता. 29 सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या पुंडलीकनगर भागातील एका मटन खानावळवाल्याने त्यास ओळखले आणि पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. तो छत्रपती चौकात एका दवाखान्याजवळ थांबलेला होता. मी पत्रकार आहे असे सांगून तो पोलीसांना भिती दाखवत होता. तरीपण पोलीसांनी संतोष जामनीकला ताब्या घेवून नांदेडला आणले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सुधाकर आडे आणि रितेश कुलथे यांचे कौतुक केले आहे. न्यायालयाने पकडून आणलेल्या संतोष जामनीकला 5 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *