नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा अभिवक्ता संघटनेच्या अध्यक्ष पदी अँड. सतीश पुंड निवडून आले आहेत. प्रतिस्पर्धी अँड. मिलिंद एकताटे हे होते. या निवडणूकीत सह सचिव पदाचे उमेदवार अँड.रुशीकेश संतान फक्त एका मताच्या आघाडीने निवडून आले आहेत.
आज नांदेड अभिवक्ता संघाची द्विवार्शिक निवडणुक पार पडली. या निवणूकीसाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजी मतदान झाले.त्यात 1252 मतदारांपैकी 1117 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.टक्केवारी नूसार 89 टक्के मतदान झाले.
आज दिनांक 1 आँक्टोबर रोजी मतमोजणी झाली.त्यात प्रमुख निवडणुक निर्णय अधिकारी अँड.मुकुंद चौधरी, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी अँड.बी.जी.मोरे आणि अँड.एम.जी. बादलगांवकर यांच्यासह अँड.एन.जी.शिंदे,अँड. शेख सुलेमान, अँड.पी.एस.उपाशे,अँड.प्रविण लिंबुरकर, अँड.अब्बास खान, अँड. एल.जी. पुयड,अँड. भंवर व्यंकटेश,अँड.अभय सोळंखे,अँड.विलास देशमुख,अँड. केशव हनमंते,अँड. संभाजी हनमंते,अँड. निखील चोधरी,अँड.आर.आर.नरवाडे यांनी परिश्रम घेतले.
जिंकलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.अध्यक्ष – अँड.सतीश पुंड, उपाध्यक्ष- अँड.विजय बारसे,सचिव-अँड. नितीन कागणे, सह सचिव- अँड रुषीकेश संतान,कोषाध्यक्ष-पांडूरंग अंबेकर,विशिष्ट सहायक – अँड अजीम सिध्दीकी या नव निर्वाचीत वकील संघाच्या सदस्यां मध्ये रुषीकेश संतान फक्त एका मताच्या आघाडीने निवडून आले आहेत. तसेच सचिव पदी नवनिर्वाचित अँड. नितीन कागणे हे दुसऱ्यांदा याच पदावर निवडून आले आहेत. नवनिर्वाचीत बारा सदस्यांची नावे समजली नाहीत.
नांदेड(प्रतिनिधी)-गट विकास अधिकारी पंचायत समिती बिलोली यांना भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती उपसभापती यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बिलोली पोलीसांनी उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे आणि सभापतीला शोधण्यासाठी बिलोलीचे पोलीस पथक रवाना झालेले आहे. बिलोली पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी प्रकाश वसंतराव नाईक (54) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.10 नोव्हेंबर रोजी […]
नांदेड(प्रतिनिधी)-घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या शमा गॅस एजन्सीच्या डिलेव्हरी पर्सन करणाऱ्या कांही मंडळींना जास्तीची रक्कम ग्राहकांकडून उकळण्याची सवय लागली आहे. एका सिलेंडर मागे 55 रुपये जास्त मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी अगोदर काही अनुदानपण होते पण आता अनुदान जवळपास बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आज घरगुती […]
नांदेड (प्रतिनिधी)-शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक श्री.चंद्रसेनजी देशमुख साहेब यांनी ब्लॅकलिस्ट असतांना अवैध रित्या वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक करणारी हायवा गाडी सकाळी 4.30 वाजता पकडली आहे. वास्तव न्युज लाईव्हने 6 ऑगस्ट रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फक्त एकाच हायवा गाडीला वाळू उपसा करण्याची परवानगी असल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. या गाडीचा क्रमांक एम.एच.23 ए.यु.1258 […]