क्राईम

खंडणी मागून जीवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-कौठा पोलीस चौकी समोर असलेल्या अंबीका सॅनेटरी या दुकानात जाऊन एकाने 10 हजारांची खंडणी मागून जीवघेणा हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर दुर्गाजी गोरे हे आपल्या दुकान अंबीका सॅनटरी येथे 30 सप्टेंबरच्या दुपारी बसले असतांना तेथे बलजितसिंघ उर्फ सल्लूसिंघ गुरजितसिंघ भाटीया रा.बसवेश्र्वरनगर हा आला आणि त्याने शंकर गोरे यांना 10 हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यावेळी दुकानात कैलास परिवाले व बाळू माने हे दोघे बसलेले होते. पैसे दिले नाही म्हणून सल्लू सिंघने तुला खतम करतो म्हणून उपरण्यात लपवलेला लोखंडी रॉड काढून शंकर गोरे यांना मारला. या हल्यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर जखम झाली असून तो हात फॅक्चर झाला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 697/2021 कलम 307, 504, 506 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *