नांदेड(प्रतिनिधी)-कॉंग्रेस पक्षातील फॉर्म्युल्यानुसार नांदेडच्या महापौर मोहिनी येवनकर यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर आज सर्वसाधारण सभेत महापौर पदाचा राजीनामा दिला.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये कॉंगे्रसची एकहाती सत्ता आली. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा, त्याचे नावे व्हावे या धर्तीवर महापौर पद एक वर्षासाठी राहिल असा फॉर्म्युला. त्यानुसार ओबीसी प्रवर्गातील मोहिनी विजय येवनकर यांना 22 सप्टेंबर 2020 रोजी महापौर पद प्राप्त झाले. त्यांचा कार्यकाळ 22 सप्टेंबर 2021 रोजी संपला.
आज 30 सप्टेंबर रोजी ऑनलाईन सर्वसाधारण सभा झाली. त्यात त्यांनी आपल्या महापौर पदाचा राजीनामा प्रभारी आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडे सादर केला. सध्या शहरात पुर परिस्थिती आहे. या परिस्थितीत महापौर मोहिनी येवनकर यांनी दिलेला राजीनामा कॉंग्रेसच्या रणनितीवर सर्वांचे लक्ष वेधणारा आहे.
