नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातून आपली सेवा केल्यानंतर विहित वयोमानानुसार आज 3 पोलीस अंमलदार नांदेड जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. त्यांना पोलीस विभागाच्यावतीने सपत्नीक सत्कार करून भविष्यासाठी शुभकामना देण्यात आल्या.
पोलीस विभागातील पोलीस अंमलदार जयसिंह करणसिंह ठाकूर, नारायण मारोती सूर्यवंशी दोघांची नियुक्ती पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड आणि दिपक शेषराव गाडे नियुक्ती पोलीस मुख्यालय नांदेड या तिघांना आज सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांना त्यांच्या पत्नी व लेकरांसह बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. भविष्यातील जीवनात कांही अडचणी आल्यास आम्ही तुमच्या मदतीला तयार राहू असे पोलीस विभागाने सांगितले. हा कार्यक्रम जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस अंमलदार उत्तम वाघमारे, सूर्यभान कागणे, राखी कसबे यांनी उत्कृष्टपणे नियोजित केला होता.