नांदेड(प्रतिनिधी)-मर्चंटस कॉपर्रेटीव्ह बॅंकेच्या सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह दोन जणांविरुध्द न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी कट रचून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे भुखंड बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
बालासाहेब रावसाहेब सुर्यवंशी, यांनी नांदेड न्यायालयात दाद मागितली की, शंकर सायन्ना गालेवाड आणि मर्चंटस कॉपर्रेटीव्ह बॅंकेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक देवराळ बोराळकर या दोघांनी त्यांचे आणि साक्षीदारांचे मालकी हक्क असलेले दासगणुनगर, वसरणी येथील भुखंड क्रमांक 181 बाबत खोटे कागदपत्र तयार करून, कट रचून विक्री करण्याचा प्रयत्न केला. यावरून नांदेड न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 688/2021 कलम 120(ब), 406, 409, 420, 467, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक बिच्चेवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
