नांदेड

पावसाचे तांडव ……. 

नांदेड,(प्रतिनिधी)- पावसाचे तांडव रात्रभर सुरूच आहे.विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.शहरात गल्लोगल्ली पाणी साचले आहे.कोणी मरण पावले तर जाळण्यासाठी जागा नाही.संत दास गणू पूल बंद झाला आहे.ग्रामीण भागात परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.नांदेड – नागपूर बस पाण्यात खड्ड्यात पडली आहे.पावसाचे तांडव सुरूच राहणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने सांगितले आहे.
                     
          निसर्गाने पावसाच्या माध्यमातून तांडव सुरूच ठेवले आहे.रात्रभर धो धो पाऊस पडत होता.सकाळी सुद्धा पावसाने काही उसंत घेतलेली नाही.सकाळी १० वाजेपर्यन्त पाऊस सुरूच होता.शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत असल्याने पाणी तुंबले आहे.संत दास गणू पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे.सांगवी जवळच्या नवीन पुलाखाली पाणी उंच उंच येत आहे.बस स्थानक पाण्याने वेधले आहे. हिंगोली अंडरब्रिज पाण्याने भरला आहे.छोट्या छोट्या गल्लीमध्ये पावसाचे पाणी तुंबले आहे.अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.स्मशान पूर्ण पाने पाण्याखाली गेले आहेत.आज कोणी मरण पावला तर त्याची  करणे अवघड झाले आहे.
                       
            आपत्ती व्यवस्थापन आणि त्यांची मंडळी कोठे गायब झाली आहे. अनेक लोक प्रशासकीय यंत्रणा येणार आणि आमची मदत करणार असा विचार करीत आहेत.पण मदत काही आलेली नाही.गोदावरी नदीत पाण्याच्या पातळीने ३५० मीटरची उंची गाठलेली आहे.स्वतः चा बचाव स्वतः करण्यापलीकडे आता दुसरा पर्याय दिसत नाही आहे. पाण्याचे तांडव अजून दोन दिवस सुरु राहणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे.
                          नागपूर आगाराची एक बस सकाळी ५ वाजता नांदेड नागपूर मार्गावर धावू लागली.उमरखेड ते पुसद मार्गावर हि बस क्रमांक एमएच ४१ बीटी ७०१८ धावत असतांना एका गावातील पाणी दुथडी वाहत होते, लोकांनी बस चालकाला पाण्यात गाडी नेऊ नका असा सल्ला पण दिला होता.पण बस चालकाने ऐकले नाही आणि बस डावीकडे पाण्यात कलंडली आणि खड्ड्यात पडली.सुदैवाने यात जीवित हानी झाल्याचे अद्याप कळले नाही.व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक अत्यंत छोटासा बालक बस मधील प्रवाश्यांच्या मदतीला धावतांना दिसतो.त्याचे कौतुक केले तेवढे कमी आहे.
             
         जोरदार पाऊस पडत असतांना वृत्तपत्र विक्रेते मात्र लोकांना पेपर लवकरात लवकर मिळावा यासाठी घेत असलेली मेहनत प्रशंसनीय आहे.जनतेने लक्षात ठेवावे गोदावरी नदी ३५४ मीटर पर्यंत उंच झाली तर तो धोकाच आहे.तेव्हा कोणाकडून मदत मिळेल यापेक्षा आपण कोणास मदत करू शकतोय काय हे पाहावे.पण स्वतः सुरक्षित राहूनच इतरांची मदत करता येते हे समजून घ्यावे, तरीही जीव रक्षक दलाचे सदस्य गोदावरी नदी काठी उभेच आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *