नांदेड

ओबीसी राष्ट्रीय जनगणनेसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन 

नांदेड(प्रतिनिधी)-आज पडत्या पावसात वंचित बहुजन आघाडीने ओबीसीच्या राष्ट्रीय जात निहाय जनगणने करीता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 
                        वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात लिहिले आहे की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसी या प्रवर्गाची जनगणना करण्यात आली नाही. देशाच्या अर्थसंकल्पात ओबीसीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतुद करण्यासाठी ओबीसीची जात निहाय जनगणना अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकार यावर लक्ष देत नाही. ओबीसीच्या विविध संघटनांनी मागणी करून सुध्दा त्याकडे जाणीव पुर्व दुर्लक्ष केले जात आहे. विविध विकासात्मक योजना आखण्यासाठी जनगणनेत ओबीसीची जातनिहाय जनगणा आावश्यक आहे. तरच केंद्र सरकार त्यासाठी आर्थिक तरतूद करू शकतो. एका प्रकारणात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचा डेटा मागितला असतांना सुध्दा केंद्र सरकारने तो डेटा दिलेला नाही. ओबीसीला विविध क्षेत्रात आरक्षण वाचवायचे असेल तर राष्ट्रीय जनगणना होणे आवश्यक आहे. 
यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी इंजि.प्रशांत इंगोले, डॉ.संघरत्न कुऱ्हे, प्रा.साहेबराव बेळे, शाम कांबळे, आयुब खान, विठ्ठल गायकवाड, उत्तम धर्मेकर, अमृत नरंगलकर, पद्माकर सोनकांबळे, व्यंकटेश पवार, सय्यद अन्सार, कैलास पवार, संजय निळेकर, डॉ.संतोष वाठोेरे, किशन राठोड, देवानंद पाईकराव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या संदर्भाचे एक निवेदन सुध्दा जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.