नांदेड

अनुकंपाच्या योजनेत आता गट अ आणि गट ब चे अधिकारी-कर्मचारी सामील

नांदेड(प्रतिनिधी)-आजपर्यंत अनुकंपा तत्वावर फक्त गट क व गट ड या संवर्गामध्ये एखाद्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसापैकी एकाला नोकरी दिली जात होती. महाराष्ट्र शासनाने या निर्णयात सुधारणा करून आता या पुढे गट अ आणि गट ब या संवर्गांमध्ये सुध्दा अनुकंपातत्वावर मयत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसापैकी एकाला नोकरी देण्यात येईल असा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या एका शासन निर्णयानुसार यापुर्वी शासन सेवेतील अनुकंपानियुक्ती धोरणात थोडासा बदल करण्यात आला आहे. यामध्ये पुर्वी फक्त गट क आणि गट ड या संवर्गात अनुकंपात्वानुसार शासकीय सेवेतील मृत्यू पावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसापैकी एकाला सहानुभूती या तत्वावर नोकरी मिळत होती. कोविड पार्श्र्वभूमी विचारात घेता गट अ आणि गट ब या संवर्गामध्ये सुध्दा अनुकंपातत्वावर आता नियुक्ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. गट अ आणि गट ब या संवर्गातील शासकीय अधिकारी मरण पावल्यास त्यांच्या वारसापैकी एकाला गट क आणि गट ड मध्ये नियुक्ती अनुकंपातत्वावर मिळणार आहे. कोविड पार्श्र्वभूमीवर या योजनेचा लाभ 1 जानेवारी 2020 पासून अनुज्ञेय करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा आहे. यावर उपसचिव गिता कुलकर्णी यांची स्वाक्षरी आहे. महाराष्ट्र शासनाने आपला हा निर्णय संकेतांक क्रमांक 202109271656039507 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.