नांदेड(प्रतिनिधी)-उमरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर अधिकाऱ्याला दोन जणांनी शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मांडवी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी बाजार येथे डॉ.अश्विनी दिलीप मुंडे कार्यरत आहेत. दि.24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता डॉ.अश्विनी मुंडे उमरी बाजार ता.किनवट येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत असतांना बाह्य रुग्णांच्या औषधी चिठ्ठ्या लिहित होत्या. त्यावेळी चेतन जाधव आणि श्रावण पवार या दोघांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या नातलगांना तपासणीसाठी आणले होते. त्यावेळी डॉ.अश्विनी मुंडे यांच्या हातातील चिठ्ठी हिसकावून घेवून या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. मांडवी पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक पठाण करीत आहेत.
