170 पोलीस उपअधिक्षकांची पदे रिक्तच राहणार
नांदेड(प्रतिनिधी)- राज्यात 350 पोलीस उपअधिक्षकांची पदे रिक्त आहेत. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मान्यतेने अपर पोलीस महासंचलाक संजीवकुमार सिंघल यांनी 180 पोलीस निरिक्षकांची निवड यादी प्रसिध्द केली आहे, ज्यांना पोलीस उपअधिक्षक पदावर पदोन्नती देणे आहे. तरीपण राज्यात 170 पोलीस उपअधिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. संजीवकुमार सिंघल यांनी काढलेल्या पत्रकात 27 सप्टेंबर रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवड सुचीतील 180 पोलीस निरिक्षकांना राज्यातील कोणत्या विभागात पदोन्नती पाहिजे याबद्दल माहिती पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या यादीमध्ये नांदेड जिल्ह्यात कार्यरत तीन पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे.
अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी निवड सुचीतील पेालीस निरिक्षकांचे पसंदीक्रम विचारून ते पोलीस महासंचालक कार्यालयाला कळविण्यासाठी आदेश दिले आहेत. राज्यात 350 पोलीस उपअधिक्षकांची पद्दे रिक्त आहेत. ज्यामध्ये विभागवार ही पदे पुढील प्रमाणे आहेत. कोकण-1, कोकण-2, नाशिक-15, पुणे-39, नागपूर-53, अमरावती-42, औरंगाबाद-45 अशी एकूण 350 पदे रिक्त आहेत.
या पदांवर पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून पोलीस उपअधिक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यासाठी 180 पोलीस निरिक्षकांची यादी राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांना पाठविण्यात आली आहे. या 180 जणांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांना कोणत्या पसंदीच्या विभागात नियुक्ती पाहिजे ही माहिती पाठविण्यासाठी आदेश दिले आहेत. पोलीस निरिक्षकांची निवड पसंदी 27 सप्टेंबरच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाच्या ईमेलवर पाठवायची आहे.
नांदेड जिल्ह्यातील तीन पोलीस निरिक्षक या यादीत
नांदेड जिल्ह्यातील नियत्रंण कक्षात कार्यरत पोलीस निरिक्षक विजय नागोराव डांगरे, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात कार्यरत पोलीस निरिक्षक मधुसूदन देविदास अंकुशे आणि किनवट पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरिक्षक मारोती ज्ञानोजी थोरात यांचा या पदोन्नती यादीत समावेश आहे.
या यादीत अगोदर नांदेडमध्ये कार्यरत असलेले आणि सध्या चंद्रपूर येथे पोलीस निरिक्षक असलेले मल्लीकार्जुन प्रल्हादराव इंगळे, परभणी येथे कार्यरत सुभाष सुंदरसिंघ राठोड, जालना येथील देविदास काशीनाथ शेळके, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे कार्यरत अपूर्वसिंह प्रतापसिंह गौर, नवी मुंबई येथे कार्यरत सुर्यकांत दत्तात्रय जगदाळे, नाशिक शहरात कार्यरत संभाजी सर्जेराव निंबाळकर यांचाही समावेश आहे.
