क्राईम

पुरात वाहून गेलेल्या बालकाचा मृत्यदेह 46 तासानंतर सापडला 

नांदेड(प्रतिनिधी)-बैलगाडीसह आसना नदीच्या पुरात वाहून गेलेला बालक आसना नदीवरील नवीन पुलाखालच्या बंधाऱ्यात अडकून राहिल्याने त्याचा मृतदेह सापडण्यास 46 तासांचा वेळ लागला. आज त्या बालकावर पिंपळगाव (म) येथे अंतिमसंस्कार करण्यात आले.
                 दि.23 सप्टेंबर रोजी पिंपळगाव महादेव येथील सालगड्याचा मुलगा सुदर्शन ईरबाजी झुंजारे (16) हा बैलगाडी घेवून गावाकडे जात असतांना आसना नदीत आलेल्या पुराच्या पाण्यात तो बैलगाडीसह वाहून गेला. कांही तासातच बैलगाडी आणि मरण पावलेले बैल सापडले होते. पण मुलगा मात्र सापडला नव्हता. त्याचा शोध सर्वत्र सुरू होता. पण 46 तासानंतर आज शनिवारी शोध पथकाने केलेल्या प्रयत्नांना यश आले. आणि सुदर्शनचा मृतदेह आसना नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाखाली बंधारात अडकून होता तो सापडला.
                या सर्व कामावर तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरिक्षक अशोक जाधव, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, मंडळाधिकारी संजय खिल्लारे, तलाठी चंद्रकांत महाजन, सचिन स्वामी, ग्रामसेवक अनिल गित्ते, मिर्झा बेग, मदन देशमुख, पोलीस हवालदार बालाजी तोरणे, ईश्र्वर लांडगे, कपील दुधमल, उध्दवराव कल्याणकर, संतोष कल्याणकर, दिगंबर कल्याणकर, अजय देशमुख, उल्हासराव कल्याणकर, कैलास कल्याणकर, राम कल्याणकर, चैतन कल्याणकर, राजेश कल्याणकर, तानाजी कल्याणकर, भगवान कल्याणकर, शिवाजी खंडागळे, पवन कल्याणकर, आकाश कल्याणकर, सोनु कल्याणकर, राजेश कल्याणकर, अविनाश कल्याणकर, कुणाल कल्याणकर, अनेक ग्रामस्थ आणि जीव रक्षक दलाच्या सदस्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सुदर्शनचा मृतदेह सापडला.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *