नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेने 1 लाख रुपये खंडणी मागून 50 हजार रुपये घेतांना तिला पकडण्यात आले. या महिलेला मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार रहांगडाले यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
वजिराबाद भागातील मनिष रतिलाल गडीया या माणसाने दिलेल्या तक्रारीनुसार 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास एका 35 वर्षीय महिलेने त्यांच्याकडून ओळखीचा फायदा घेवून त्यांच्याकडून 1 लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी दिली आणि जिवे मारण्याची धमकीपण दिली. यानंतर वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वात पोलीसांनी पंचासमक्ष सापळा लावता तेंव्हा त्या महिलेने मनिष गडीयाकडून 50 हजार रुपये घेतांना तिला पकडण्यात आले याप्रकरणी वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 386 नुसार गुन्हा क्रमांक 341/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सौमित्रा मुंडे यांच्याकडे देण्यात आला.
आज 24 सप्टेंबर रोजी पकडलेल्या महिलेला पोलीस उप निरीक्षक सौमित्रा मुंढे,पोलीस अंमलदार प्रदीप कांबळे,बबिता तिवघाळे आणि कांबळे यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. असतांना न्या.योगेशकुमार रहांगडाले यांनी त्या महिलेला 2 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
