नांदेड

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची कन्या बनली बालरोग तज्ञ

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील देगावचाळ येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ.जयश्री चंद्रकांत सावळे ह्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून एमबीबीएस एमडी (बालरोगतज्ज्ञ) ही परीक्षा नागपुर महाविद्यालयात प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. पोलीस विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांची कन्या आहे. डॉ.जयश्री ह्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालय व शाहु महाविद्यालय येथे झाले आहे. डॉ.जयश्री सावळे हिचे एमबीबीएसचे शिक्षण नामांकित असलेले जे.जे. वैद्यकीय महाविद्यालय,मुंबई येथे व एमडीचे शिक्षण इंदिरागांधी वैद्यकीय महाविद्यालयात,नागपूर येथे झालेले आहे. डॉ. जयश्री ह्या आपल्या उच्चविद्याविभूषित होण्याचे श्रेय आपल्या वडिलांसह आई लक्ष्मीबाई सावळे, आजोबा लक्ष्मण सावळे, आजी मुक्ताबाई सावळे ह्यांना देतात. 
                                डॉ. जयश्री यांच्या अभुतपुर्व यशाबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर न्यायाधीश रावसाहेब कोकरे,पो. नि. विजयकुमार डोंगरे , भगवंतसिंग हुजुरिया, डॉ.विनोद बोधीगीरे, डॉ. प्रमोद धुतडे, SBI बँकेचे आशिष जाधव, पाटील लक्ष्मीकांत (कृषी आधिकारी), वसंत जारीकोठे (अभियंता), किरण सोनखेडकर, संतोष भवनगिरे ,  संतोष चंचलवार शाखा अभियंता, झाकिर, सर दिपक महालिंगे( वरिष्ठ लिपिक, जि.प. नांदेड), संदिप ढगे, किसनराव सावळे, पंढरी सावळे, नामदेव थोरात, प्रा. विजय गंगावणे, बनकर, साहित्यिक गंगाधर ढवळे, सुभाष लोखंडे, ज्ञानोबा दुधमल.साहेबराव थोरात, ग्रंथ वाचक राहुल कोकरे , डी एन कांबळे, राष्ट्रपाल झिंझाडे, बाळासाहेब साहेबराव देशमुख, सुरेश सावळे इत्यादींनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.