नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील पश्चिम दिशेच्या शेवटच्या कोपऱ्यातील पोलीस ठाण्याच्या शेवटच्या हद्दीत सुरू असलेला 52 पत्यांचा जुगार अड्डा कोणीच बंद करू शकत नाही. यावरून या धंद्याला छुपे संरक्षण आहे काय? हा प्रश्न समोर आला आहे.
52 पत्याच्या जुगार अड्यावर कांही दरोडेखोरांनी दरोडा टाकून लाखोंची लुट केली. सोबतच सर्वसामान्य माणुस त्या दहशतीने गांगरला. तो जुगार अड्डा चालक पुन्हा एकदा सुरक्षीतपणे जुगार अड्डा कसा चालवता येईल याची तयारी करत आहे. असाच एक मोठा जुगार अड्डा मरळकला जाणाऱ्या रस्त्यावर एका धाब्याच्या पाठीमागे सुरू आहे. या जुगार अड्ड्याला तीन्ही बाजूने रस्ते आहेत. एका रस्त्याची हद्द लिंबगाव पोलीस ठाणे आहे आणि दुसऱ्या दोन रस्त्यांची हद्द भाग्यनगर पोलीस ठाणे आहे. या जुगार अड्ड्यावर येणारे जुगारी आपली वाहने धाब्यासमोर जावतात. त्यामुळे हा जुगार अड्डा सहसा लक्षात येत नाही. या बद्दल आजपर्यंत कोणीच कार्यवाही केली नाही. यामुळे या जुगार अड्ड्याला छुपे संरक्षण आहे काय? असा प्रश्न समोर येत आहे.
असाच एक जुगार अड्डा इतवारा हद्दीत सुध्दा सुरू आहे. या जुगार अड्ड्याला आता मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. याबद्दल मागोवा घेतला असता त्याच्या आसपासच्या जुगार अड्ड्यांना परवानगी नाकारण्यात आली म्हणून सध्या सुरू असलेल्या जुगार अड्याला वैभव प्राप्त झाले आहे. भारतात प्राचीन काळापासून जुगार सुरू आहे. त्यातील महाभारतातील जुगार सोंगाड्यांच्या माध्यमाने कंस मामाने जिंकला होता आणि त्यातून काय घडले ते शेवटी कुरूक्षेत्रात संपले. आजही जुगार अड्ड्यांवर असेच कांही घडत असेल पण ते समोर येत नाही. तरीपण जुगार अड्डे सुरूच राहतात हेच या लोकशाहीचे दुर्देव आहे.
