नांदेड

माधव देवसरकरने आपला गुन्हा कबुल केला ; एका ऑडीओ क्लिपमुळे झाला हा खुलासा 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील महिलेची फिर्याद नाकारून नंतर महिलेच्या पतीने पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्या गुन्ह्याचे स्वरुप कमी करून गुन्हा तर दाखल केला. पण आज या प्रकरणातील आरोप असलेल्या माधव देवसरकर यांनी आपल्याकडून गुन्हा घडल्याची कबुली एका ऑडीयो संदेशात बोलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
                     एका महिला मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक माध्यमाने संदेश पाठवून माधव देवसरकर यांनी आपल्यातील प्रवृत्ती दाखवली. त्यानंतर ही महिला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेली तेंव्हा चर्चा करून उद्या या असे सांगण्यात आले. पुन्हा महिला उद्या गेल्यावर तुमचीच तक्रार खोटी असल्याचे त्या महिलेला सांगण्यात आले. त्यानंतर त्या महिलेच्या पतीने पत्रकार परिषद घेवून आपल्या कुटूंबाची व्यथा सार्वजनिक केली. त्यानंतर रात्री 9 वाजता माधव देवसरकर विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 509 नुसार गुन्हा दाखल झाला. त्या पिडीत महिलेच्या पतीने पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे हा प्रकार विनयभंग, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इंटरनेटच्या माध्यमाने बदनामी या स्वरुपात येतो. या कायद्याची संपूर्ण बाजू तपासली असता अशा प्रकारचे महिलांविरुध्द घडलेल्या गुन्ह्यांची दखल न घेणाऱ्या लोकसेवकाविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 166 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची सोय कायद्यात करण्यात आली आहे. घडलेला प्रकार हा 166 (क) मध्ये येतो तो बहुदा त्या पिडीत महिलेला माहित नसेल. खरे तर ज्या पोलीस ठाण्यात अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक कार्यरत आहेत. त्या पोलीस ठाण्यात असा प्रकार घडवा हे दुर्देवीच आहे. महिलेचे प्रकरण छोट्याशा गुन्ह्यात बदलून गुन्हा दाखल केला खरा पण  गुन्हा दाखल केल्यावर या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अशा महिला पोलीस निरिक्षकाकडे द्यायला हवा होता. पण सध्या नांदेड जिल्हा पोलीस दलात महिला पोलीस निरिक्षक उपलब्ध नाहीत. तरीपण वरिष्ठ अशा महिला सहाय्यक पोलीस निरिक्षकांकडे तरी या गुन्ह्याचा तपास द्यायला हवा होता असो हा कायद्यातील प्रक्रियेचा प्रकार आहे.
               या गुन्ह्यात आरोपी असलेल्या माधव देवसरकर यांनी आपल्या एका नातलगाशी केलेल्या चर्चेचा ऑडीओ संदेश प्राप्त झाला. यात माधव देवसरकर आपल्याकडून चुक झाली असे ते कबुल करतात. पण सोबत घटनेचे राजकारण होत आहे असे म्हणतात. याचा अर्थ राजकारणात असे आपसुक घडतच असते काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पिडीत महिलेच्या कुटूंबाला या अशा घटनेमुळे किती मानसिक त्रास झाला असेल याचे तर शब्द लिहिणे अवघड आहे. पिडीत महिलेच्या सासु मॉं माधव देवसरकरला आपलाच मुलगा मानत होत्या. या विषयाला माधव देवसरकरने दिलेला तडा या ऑडीओ क्लिपमधून त्यांनी स्वत:च स्पष्ट केला आहे. घडलेली घटना आपल्या घरची आहे असे माधव देवसरकर सांगतात आणि त्यांनी केलेले कृत्य आपल्या घरात घडवावे हे दुर्देवी आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *