क्राईम

नांदेड ग्रामीण पोलीसांना मटका जुगार बंद करायचाच नाही ?

अनेक पोलीस अधिकारी ज्या व्हॉटसऍप गु्रपचे सदस्य आहेत त्यावर फोटो वायरल झाल्यावर सुध्दा कारवाई केल्याचा खुलासा केला नाही
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका हा जुगार अत्यंत जोमात सुरू आहे. असे शब्द लिहुन एका व्हॉटसऍप ग्रुपवर त्याचे फोटो प्रसिध्द करण्यात आले होते. त्या व्हॉटसऍप ग्रुपमध्ये बरेच मोठे अधिकारी सदस्य आहेत. पण या मटका जुगारावर काय कारवाई केली याचा खुलासा कोणत्याच अधिकाऱ्याने दिला नाही.
                  नांदेड जिल्ह्यातील एका व्हॉटसऍप गु्रपमध्ये जवळपास 254 सदस्य आहेत. या 254 सदस्यांमध्ये अनेक पोलीस अधिकारी आहेत. या व्हॉटसऍप गु्रपमध्ये महसुल विभागाचे मोठे अधिकारी सुध्दा सदस्य आहेत. या व्हॉटसऍप संकेतस्थळावर चार दिवसांपुर्वी एका सदस्याने 6 फोटो अपलोड केले होते. हे सर्व फोटो मटका जुगाराशी संबंधीत आहेत. हा मटका जुगार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच चालतो असेही फोटो अपलोड करणाऱ्या सदस्याने लिहिले होते. तरी आजपर्यंत अपलोड केलेल्या फोटो प्रमाणे मटका जुगारावर कार्यवाही झाली असा खुलासा या व्हॉटसऍप ग्रुप वर झाला नाही. या बाबत 2 ते 4 दिवसांच्या प्रेसनोट पाहिल्या असता त्यामध्ये सुध्दा ज्या जागेचा उल्लेख करून व्हॉटऍपगु्रपच्या सदस्याने ते फोटो अपलोड केले होते, तेथे कार्यवाही झाल्याचे गुन्हे पोलीस प्रेसनोटमध्ये नव्हते. या संदर्भाने आज माहिती घेतली असता त्या ठिकाणी आजही मटका हा जुगार सुरू असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. त्यावरून पोलीस प्रशासनाला किंबहुना नांदेड ग्रामीण पोलीसांना या मटका जुगारावर कार्यवाही करायचीच नाही मटका जुगार बंदच करायचा नाही असाच अर्थ होत आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.