
कोरोना कालखंडात दुसऱ्यांदा गणेशोत्सव साजरा झाला. सन 2020 मध्ये तर एकदम नगन्य अशा स्वरुपात सार्वजनिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापणा झाली होती. त्यामुळे विसर्जनात सुध्दा गडबड दिसली नव्हती. पण यंदाच्या गणशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी मुर्ती प्रतिष्ठापित केल्या होत्या. त्यामुळे विसर्जन होणारच होते. दुपारचे सत्र संपल्यानंतर गणेशमुर्ती एक-एक करुन विसर्जन स्थळांकडे जात होत्या. जागो-जागी लोकांनी गणेश विसर्जन भंडारा आयोजित केला होता. जनतेतील लोक सुध्दा या भंडाऱ्यातून प्रसाद प्राप्त करत होते. जनतेतील लोक गणेश मुर्तींचे विसर्जन पाहण्यासाठी बाहेर आले होते. पण त्यांची संख्या सुध्दा अत्यंत कमीच होती. कांही छोटे-छोटे वाद्य वाजविले जात होते. पण ध्वनीप्रदुशन होईल एवढा आवाज मात्र नव्हता.


महानगरपालिकेने शहरात अनेक ठिकाणी मुर्ती संकल्न केंद्र उभारले होते. अनेक घरगुती गणेशमुर्ती त्या ठिकाणी लोकांनी विसर्जित केल्या. कांही लोकांनी आपल्या घरासमोरच बादलीत श्री गणेशमुर्तीचे विसर्जन केले. कांही लोकांनी स्वत: गोदावरी नदीवर जाऊन आपल्या घरातील गणेशजींना निरोप दिला. जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या नेतृत्वात प्रशासनाची टिम काम करत होती. सायंकाळी वृत्तलिहिपर्यंत श्री गणेश विसर्जन पुर्ण झाले नव्हते.

