नांदेड(प्रतिनिधी)-उद्या 19 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन सोहळ्याच्या दरम्यान वाहतुकीचे मार्ग सहज व्हावेत आणि गणेश विसर्जन आनंदात व्हावे या उद्देशाने पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी 19 सप्टेंबरच्या सकाळी 11 ते रात्री मध्यरात्री 12 वाजेदरम्यान कांही रस्ते बंद केले आहेत. त्या रस्त्यांसाठी तर पर्याय देण्यात आले आहेत.
19 सप्टेंबर रोजी शहरातून श्री गणेश विसर्जन होणार आहे. मुख्य रस्त्यावरून विसर्जनाच्या मिरवणूक आणि वाहतूकीची सुसूत्रता राहावी म्हणून पुढे लिहिलेले मार्ग सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजेदरम्यान बंद राहण्यासाठी आधिसुचना जारी केली आहे. यामध्ये जुना मोंढा-देना बॅंक- तरोडेकर मार्केट-कला मंदिर-शिवाजीनगर-आयटीआय या रस्त्यावर जाण्या-येण्यासाठी बंदी राहिल. राजकॉर्नर ते आयटीआय येण्यासाठी राजकॉर्नर, वर्कशॉप टी पॉईंट-श्रीनगर-आयटीआय पर्यंत डावी बाजू बंद करण्यात आली आहे. राजकॉनर ते तरोडा नाकाकडे जाणारी डावी बाजू बंद राहिल. जुना मोंेढा ते महाविर चौक हा रस्ता बंद राहिल. यात्री निवास ते जुना मोंढा-बर्की चौक हा रस्ता एक मार्गी असल्याने ये-जा करण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. हडको-सिडको आणि लातूर फाटा भागातून नांदेड शहराकडे नावघाट-संतदासगणू पुल आणि नवीन पुलावरून जुना मोंढाकडे येणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहिल.
पोलीस अधिक्षकांनी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार पुढील मार्ग सर्वसामान्य वाहुकीसाठी खुले राहतील. वजिराबाद चौकाकडून-श्रीनगर-वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक वजिराबाद-तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय-पक्कीचाळ चौकी-लालवाडी अंडरब्रिज-शिवाजीनगर-पिवळीगिरी ते गणेशनगर वाय पॉईंट या मार्गावरून जाण्या-येण्यासाठी हा रस्ता सुरू राहिल. राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राजकॉर्नर-वर्कशॉप कॉर्नर-भाग्यनगर-आनंदनगर-नागार्जुना टी पॉईट-अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोलीगेट उड्डाण पुलावरून यात्रीनिवास पोलीस चौकी, अबचलनगर हा रस्ता जाण्या-येण्यासाठी सुरू राहिल. गोवर्धनघाट पुलावरून शहरात येणारी वाहतुक तिरंगा चौकातून पोलीस मुख्यालय लालवाडी अंडरब्रिज अशी गणेशनगर वायपॉईंटकडे जाण्यासाठी वापरता येईल. यात्रीनिवास ते जुना मोंढा-बर्कीचौक मार्गावरील वाहतुक-मोहम्मद अली रोड किंवा धान्य मार्केट, वाटमारी रोड, बर्की चौक ते लोहारगल्ली रोड, भगतसिंघ चौक, अबचलनगर, यात्रीनिवास चौकी किंवा बाफना टी पॉईंट असा हा रस्ता जाण्या-येण्यासाठी सुरू राहिल. लातूर फाटा-सिडको-हडको-ढवळे कॉर्नर-चंदासिंघ कॉर्नर-वाजेगाव-जुना पुल-देगलूरनाका-रजाचौक पुढे बाफना मार्गे किंवा माळटेकडी मार्गे जाण्या-येण्यासाठी सुरू राहिल. तरी जनतेने या अधिसुचनेनुसार 19 सप्टेंबरच्या सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजेदरम्यान वाहतुकीसाठी सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या मार्गांचा वापर करून आपला प्रवास करावा आणि पोलीस प्रशासनासोबत सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले आहे.
