नांदेड

माधवराव देवसरकरांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी तक्रार दाखल केली नाही

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील एक नामांकित व्यक्तीमत्व माधवराव देवसरकर यांच्याविरुध्द एका विवाहितेने दिलेली विनयभंगाची तक्रार नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल करून घेतली नाही. त्यानंतर त्या विवाहितेच्या पतीने माधवराव देवसरकर यांचा खरा चेहरा पत्रकार परिषदेत मांडला. विवाहितेच्या पतीने पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे मी माधव देवसरकर सोबत एक कार्यकर्ता होतो. पण त्याची विकृतबुध्दी आहे हे मला कळलेच नाही. एका रात्री पावणे बारा वाजता माधव देवसरकरने त्यांच्या पतीना व्हॉटसऍप संदेश पाठवला. पहिली चुक म्हणून आम्ही क्षमा केली. कारण माझी आई सुध्दा माधव देवसरकरला आपला मुलगा समजत होती. याबद्दल आता इतरही महिला आपला वाईट अनुभव सांगत आहेत असे पिडीतेचे पती म्हणाले. याबद्दल आम्ही तक्रार देण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेथे हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी माझ्या पत्नीला दीड तास बसवून घेतले आणि एकांतात विचारपुस केली आणि दुसऱ्या दिवशी या असे आम्हाला सांगितले. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा गेलो तेंव्हा अधिकारी आजारी आहेत असे सांगून तुमची फिर्याद खोटी असल्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि आमची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. यामुळेच आम्ही आज पत्रकार परिषदेत सामाजिक नेता असल्याचा बुरखा घालून माधव देवसरकर महिलांसोबत अश्लील आणि विकृत वागणूक दाखवत आहे. या प्रसंगी पत्रकार परिषदेत विविध संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *