क्राईम

कत्तीचा धाक दाखवून पैसे लुटणाऱ्या दोन जणांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्ती हताता घेवून सार्वजनिक ठिकाणी एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाला धमकी देवून पैसे काढून घेणाऱ्या दोन जणांना विमानतळ पोलीसांनी पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी या दोघांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आशुतोष अनिल गोपीनवार हा आपला मित्र शेख शाहिद शेख नजीरसह नांदेड येथे शिक्षणासाठी राहतो. हे दोन्ही मित्र उमरखेड तालुक्यातील आहेत. दि.17 सप्टेंबर रोजी त्या दोघांनी रात्री 10 वाजेच्या सुमारास आपल्या अभ्यासिकेतून परत घराकडे जातांना मयुर टॉकीजजवळ थांबलो. त्यावेळी एम.एच.26 ए.एन.5984 या दुचाकी गाडीवर दोन जण आले आणि आम्हाला पैसे काढा म्हणाले. तेंव्हा त्यातील टु साईड हेअरकट वाल्याने त्याच्याकडील चाकु काढून मित्र शाहीदच्या गळ्यावर चाकू ठेवला व दुसऱ्याने माझ्या बॅगमधील 1 हजार रुपये काढून घेतले. सोबतच म्हणाला घरी जाऊन 5 मिनिटात दोन हजार रुपये आण नाहीत तुझा मित्र शाहीदला मारून टाकतो. पण शाहीदने त्याला झटका देवून तो पळाला आणि पिरनगरजवळ जनतेतील कांही लोकांनी त्यांना पकडले त्यांची नावे रोहित उर्फ चिक्या सुभाष मांजरमकर(वय 20) रा.पौणिमानगर नांदेड आणि वैभव राजेश कौठेकर (21) रा.वैशाखीनगर नांदेड असे आहेत. जनतेने आमची मदत करत या दोघांना पकडले. गुप्ती त्यांची मोटारसायकल आणि दोन्ही दरोडेखोर पोलीस ठाणे विमानतळ येथे हजर केले. आशुतोषच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 283/2021 भारतीय दंडसंहितेच्या कलम 392, 34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला .या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके  यांच्याकडे देण्यात आला.
पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात या दोन दरोडेखोरांना कांही तासातच अटक करण्यात आली. आज दि.18 सप्टेंबर रोजी पकडलेल्या दोघांना पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके, दारासिंग राठोड, रत्नाकर कदम, रामदास सूर्यवंशी  यांनी न्यायालयात हजर केले. घडलेल्या घटनेच्या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता सरकारी वकील ऍड. मोहम्मद रजियोद्दीन यांनी मांडल्यानंतर न्या.गायकवाड  यांनी या मांजरमकर आणि कौठेकर या दोन्ही दरोडेखोरांना  एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *