नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त कोरोना लसीकरण शिबीर संपन्न

नांदेड,(प्रतिनिधी) – नशाबंदी मंडळ व व्यसनमुक्ती एक संकल्प गणेश मंडळ, नांदेड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन व्यसनमुक्ती एक संकल्प आवृतीचे मुख्य संपादक कैलाश गायकवाड यांच्यावतीने  प्रभाग क्र 9 मधील खोब्रागडे नगर नं-१ या ठिकाणी करण्यात आले होते.
    या कार्यक्रमात च्या उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ तादलापूरकर,महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा सौ. माहेश्वरी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल चे जिल्हाध्यक्ष प्रशांत असमाने,डॉ. मनीष कंधारे आणि टिम शिवशंकर मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कोरोना लसीकरण शिबिरात खोब्रागडे नगर भागातील पुरुष  महिला व युवकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत 100 जणांचे यावेळी लसीकरण करण्यात आले.
      कोरोना लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश ताडलापूरकर,साधना गायकवाड ऋषिकेश तादलापूरकर,साईनाथ पिंगळवाड,आणि मित्र मंडळाने परिश्रम घेतले.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *