स्व.गंगाधररावजी पांपटवार यांचा जयंती महोत्सव व टिचर्स क्लब रुग्णालय व सेवाभावी हॉस्पीटलच्या वर्धापन दिनानिमित्त या संस्थेने नांदेडमधील अनेक महत्वपूर्ण कामे करणाऱ्या लोकांचा सन्मान केला. हा समारंभ 15 सप्टेंबर रोजी कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आ.वसंतराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठराव भोसीकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, साहित्यीक देविदास फुलारी यांच्यासह अनेकांचा सन्मानचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिहरराव भोसीकर हे होते. इतर प्रमुख उपस्थितीतांमध्ये माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, ऍड. भाऊसाहेब देशमुख, माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांची उपस्थितीत होती. या प्रसंगी संजय आवटे हे प्रमुख वक्ते होते. त्यांनी देशाच्या योगदानात गांधी-नेहरुंचा मोठा हातभार असल्याचे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध जाती धर्माने नटलेल्या भारताला सक्षम राज्यघटना दिली.नवीन पिढीने गांधी-नेहरु-डॉ.आंबेडकर यांचा ईतिहास जाणून घ्यायला हवा तर त्यांना या महापुरूषांनी केलेल्या कामांचे महत्व कळेल.
या सन्मान समारंभात एक पोलीस अधिकाऱ्याला स्थान देण्यात आले. सामाजिक विभागात एका पोलीस अधिकाऱ्याला सन्मान देणे याचा अर्थच असा होतो की, त्यांनी अर्थात द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या जीवनातील प्रकाशाला सोबत घेतल्यामुळे त्या प्रकाशाची दखल स्व.गंगाधररावजी पांपटवार यांच्या जयंती महोत्सवात झाली. आपण आपले काम करणे हे महत्वपूर्ण आहे. त्यापासून आपल्याला कांही फळ मिळावे अशी आशा द्वारकादास चिखलीकर यांनी कधीच बाळगलेली दिसली नाही. म्हणूनच या कार्य्रकमात त्यांचा सन्मान झाला.
या कार्यक्रमात प्रा.डी.बी.जांभरूनकर, स्व.गंगाधररावजी पांपटवार, वैद्यकीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन पांपटवार, डॉ.विक्रम देशमुख, अवधुत क्षीरसागर, विजय देवडे, प्रांजली रावणगावकर, सुर्यकांत कांबळे, प्रा.मझरोद्दीन, सुर्यकांत गायकवाड, अंजली पांपटवार, डॉ.शाम वाघमारे, बालाजी पांपटवार, गोपालजी पेंडकर, संजय पांपटवार या प्रमुख नावांसह अनेक जण उपस्थित होते.