क्राईम

शेख जाकीर शेख सगीर विरुध्द व्यक्तीगत टिपण्यांसाठी माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल

खऱ्या बातम्यांचा रोष व्हॉटसऍप माध्यमातून प्रसारीत केला
नांदेड(प्रतिनिधी)- सत्यता वर्तमान पत्रात आणि न्युज पोर्टलवर छापल्यानंतर स्वत:मध्ये झालेल्या अस्वस्थतेला व्हॉटसऍप स्टेटसवर व्यक्तीगत टीपणी लिहुन व्यक्त करणाऱ्या तथाकथीत महाराष्ट्र भूषण शेख जाकीर विरुध्द पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी अर्ज दिल्यानंतर माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अर्धापूर येथे शेख जाकीर शेख सगीर नावाच्या व्यक्तीने नोंदणी कार्यालय अर्धापूर येथे एफ 0023330/एनएनडी (एम.एच.) या नोंदणी क्रमांकानुसार जन माहिती सेवा समिती ही संस्था स्थापन केली. पण या नावा ऐवजी माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य हे बोगस नाव वापरून त्यावर जन माहिती सेवा समिती ज्या नोंदणी क्रमांकानुसार नोंदणीकृत आहे तो नोंदणी नंबर वापरून आपले भव्य दिव्य कामकाज सुरू केले. हे कामकाज राज्यभर चालते. या संदर्भाने पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी दैनिक मराठवाडा नेता वर्तमानपत्र आणि टु डे वन लाईव्ह या न्युज पोर्टलवर 1950 च्या लोगो आणि नाव (चुकीच्या वापराला प्रतिबंध) कायदा संदर्भ करून माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य ही संघटना त्या कायद्याच्या अनुरूप नाही असे वृत्त छापले. सोबतच मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी दि.3 जुलै 2018 रोजी राज्यभरातील सहाय्यक आयुक्त धर्मादाय यांना जारी केलेले परिपत्रक क्रमांक 543 चा संदर्भ देवून पुन्हा एकदा माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य कशी चुकीची आहे याचा संदर्भ छापला. रामप्रसाद खंडेलवाल यांनी छापलेल्या बातम्यांना इतर कांही वर्तमान पत्रांनी आणि न्युज पोर्टलनी प्रसिध्दी दिली.
या संदर्भांमुळे माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य कशी बोगस आहे या बाबत समाजात पसरलेले वृत्त शेख जाकीर शेख सगीर या व्यक्तीला झोंबले. या पुर्वी सुध्दा दोन बातम्यांसाठी दिवाणी न्यायालयात रामप्रसाद खंडेलवाल व इतरांविरुध्द बदनामीचा वाद दाखल करून शेख जाकीर शेख सगीरने आपल्या बदनामीची किंमत स्वत: ठरवली. ती प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. पण काल दि.14 सप्टेंबर 2021 रोजी आपला दुरध्वनी क्रमांक 9975985944 या वरील व्हॉटसऍप स्टेटसमध्ये मी फोडतो, आता गेले सर्व, आता तुमचा नंबर अशा शब्दांसह कांही वयक्तीक शब्द वापरून अनेक स्टेटस लावले. सर्व स्टेटसमधील शब्द लिहुन आम्ही आमचा डीएनए घाणेरडा आहे हे दाखवू इच्छीत नाही. पण ते स्टेटस सर्वत्र ईलेक्ट्रानिक माध्यमांच्या आणि इंटरनेटच्या सहाय्याने व्हायरल करून प्रसारीत केले.
याबाबत बातमी लिहिणे जो पिंड आहे त्याच्यापेक्षा व्यक्तीगत दृष्टीकोणातून टीपणी करणे रामप्रसाद खंडेलवाल यांचा अपमान करणारे होते. म्हणून या संदर्भाने त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात अर्ज देवून दाद मागितली. याची दखल घेत पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता 1960 च्या कलम 501 आणि माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 च्या कलम 67 नुसार शेख जाकीर शेख सगीर या तथाकथीत महाराष्ट्र भूषणाविरुध्द गुन्हा क्रमांक 320/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वजिराबाद येथील पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे देण्यात आला आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.