क्राईम

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टरचे घर फोडले

भिक्षुकाचे घर फोडले ; सहा मोटारसायकली चोरल्या; एक क्विंटल उडीद चोरले
नांदेड(प्रतिनिधी)-मुजामपेठ परिसरात एका डॉक्टरचे घर फोडण्यात आले आहे. शहरातील विष्णुनगर परिसरात एक घर फोडले आहे. सहा दुचाकी गाड्या जिल्ह्यात चोरीला गेल्या आहेत. माळेगाव मक्ता शिवारातून एक क्विंटल उडीद चोरीला गेला आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये मिळून 2 लाख 92 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
डॉ.अहमद आवेस हुवेतीब हामेद हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7 ते 13 ऑक्टोबरच्या पहाटे 9.15 वाजेदरम्यान नावघाट रस्त्यावरील मुजामपेठ येथील आपले घर बंद करून ते लेबर कॉलनी नांदेड येथील नातेवाईकांकडे गेले होते. चोरट्यांनी त्यांचे घर फोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
संतोष बळीराम शास्त्री या भिक्षुकाचे घर फोडून चोरट्यांनी 44 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. संतोष शास्त्री यांचे घर विष्णुनगर भागात आहे. ते दि.12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता आपले घर बंद करून आपल्या मेहुण्याच्या घरी गेले होते. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता परत आले तेंव्हा त्यांचे घर फोडलेले होते. त्यांच्या घरातून एक टी.व्ही. सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 44 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार गोटमवाड हे करीत आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रदिप मोतीराम भालेराव यांची एम.एच.26 ए.एम.1495 ही दुचाकी 12 सप्टेंबर रोजी निजाम कॉलनी येथून चोरीला गेली. या गाडीची किंमत 40 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दि.13 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 2 या एक तासात कलाल गल्ली नांदेड येथून आनंद मदनसिंह बैस यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एच.8276 ही 50 हजारांचा गाडी चोरीला गेली आहे. इतवारा पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला आहे. बाजार गल्ली किनवट येथून 22 सप्टेंबर रोजी 15 मिनिटाच्या वेळेत दिनेश गणपत गुरनुले यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.बी.3905 ही 20 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
किन्हाळा शिवारातून दत्ता नामदेव कल्याणे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.झेड.3622 ही 25 हजार रुपये किंमतीची गाडी 9 सप्टेंबर रोजी अर्ध्या तासाच्या दरम्यान चोरीला गेली. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सारखी येथील शिवाजी चौक येथून 13 सप्टेंबर रोजी आनंता उकंडराव मुंडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.29 ए.पी.6554 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. सिंदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शारदानगर नांदेड येथून प्रविण सुरेशराव हिंगमिरे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 क्यु.0527 ही 1 सप्टेंबर रोजी चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
कपील रघुनाथ डुमणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 सप्टेंबरच्या सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेदरम्यान त्यांच्या माळेगाव मक्ता शेत शिवार ता.देगलूर येथून 1 क्विंटल उडदाची राशी, 6 हजार रुपये किंमतीचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरला आहे. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कदम अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.