क्राईम

रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र देवून सात जणांची 30 लाखांना फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)- खोटे बनावट रेल्वेचे नियुक्तीपत्र तयार करून काही भामट्यांनी गरजवंतांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. 7 जणांकडून या भामट्यांनी 30 लाख 10 हजार रुपये ठकवले आहेत.
यशवंत कालीदास बिरादार या विद्यार्थ्यांने दिलेल्या तक्रारीनुसार रेल्वे विभागात टी.सी., लिपीक पदावर नोकरी लावतो म्हणून मधुकर विठ्ठलराव पाटील, प्रताप मधुकर पाटील आणि महादाबाई मधुकर पाटील सर्व रा.रामपूर रोड देगलूर यांनी या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले. ज्यामध्ये यशवंत बिरादारकडून 5 लाख 80 हजार, संग्राम प्रभाकर जाधवकडून 5 लाख 30 हजार, कामाजी देविदासकडून 3 लाख, भरत विठ्ठलकडून 3 लाख, सचिन लक्ष्मण गंदपवाडकडून 3 लाख, दिलीप कलबुर्गेकडून 3 लाख, किरण मक्काजी कुरूळेकरकडून 4 लाख आणि प्रविण हणमंतराव तेलंगेकडून 3 लाख असे एकूण 30 लाख 10 हजार रुपये बॅंक खात्यावर तर कधी रोख रक्कम घेवून रेल्वे मंत्रालयाच्या खोट्या व बनावट लेटर पॅडवर नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षणाचा आदेश देवून फसवणूक केली आहे. या बाबत त्यांच्याकडून पैसे मागितले असता त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या तक्रारीनुसार देगलूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 398/2021 कलम 420, 468, 470, 471, 473, 507 आणि 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.