नांदेड(प्रतिनिधी)-17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतांना मास्क बांधणेे आवश्यक आहे आणि कोरोन विषाणू संदर्भाने केंद्र सरकारच्या गृहमंत्रालय, आरोग्य व कुटूंब विभाग यांनी दिलेल्या सुचना स्पष्टपणे मांडायच्या आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, जालना, हिंगोली आणि नागपूर विभागातील चंद्रपुर अशा 9 जिल्ह्यांमध्ये साजरा होत असतो.
17 सप्टेंबर हा कायम स्वरुपी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये साजरा होतो. विभागीय मुख्यालय औरंगाबाद येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. इतर जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री ध्वजारोहण करतील. महाराष्ट्र शासनाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सुट्टी जाहीर केलेली आहे. मराठवाड्यातील सर्व तालुके तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, पोरपणा, राजूरा आणि जिवती या तिन तालुक्यांमध्ये ध्वजारोहण होईल. सर्व ठिकाणी ध्वजारोहण एकाच वेळी एकाळी 9 वाजता होईल.
जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिक, महानगरपालिका-नगरपालिका या संस्थांचे अध्यक्ष, इतर पदाधिकारी, नगरसेवक, राजकीय पक्षांचे स्थानिक प्रमुख, दलितमित्र पुरस्कार व शासकीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक अधिकारी आणि स्थानिक मान्यवर नागरीक, सैन्य दलातील शौर्य चक्र व इतर पदक विजेते यांना निमंत्रीत करण्यात यावे असे या सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रात लिहिले आहे.
कोरोना विषाणुची पार्श्र्वभूमी लक्षात घेता, कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम साजरा होईल असे करायचे आहे. आयोजकांची ही संपूर्ण जबाबदारी आहे. समारंभात उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाख परिधान करायचा आहे. या पत्रावर सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी प्र.कि.सांगळे यांची स्वाक्षरी आहे.
