महाराष्ट्र

पोलिसांना साप्ताहिक सुटीच्या आदल्या रात्री तणावाचे काम,रात्रीची गस्त नाही – पोलीस महासंचालक संजय पांडे  

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देतांना त्याच्या पहिल्यादिवशी कोणतेही शारिरीक व मानसिक तणाव त्याच्यावर येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश राज्यभरातील पोलीस घटक प्रमुखांना केले आहेत.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील सर्व पोलीस अधिक्षक, सर्व समावेशक राज्य राखीव पोलीस बल गट यांना निर्देशीत केलेले पत्र महत्वपुर्ण आहे. त्यात संजय पांडे यांनी असे नमुद केले आहे की, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देतांना त्या सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्रीची गस्त, 24 तास कर्तव्य अशा प्रकारची मानसिक व शारिरीक तणावाची जबाबदारी देण्यात येते. त्यामुळे संबंधीत अधिकारी व कर्मचारी साप्ताहिक सुट्टीचा उपभोग आणि त्याचा उद्देश निर्थक होतो. ही बाब विचारात घेवून पोलीस घटक प्रमुखांनी पोलीस अधिकाीर आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या आदल्या दिवशी अशी कोणतीही कर्तव्य देवू नये ज्यामुळे त्यांची साप्ताहिक सुट्टी निर्थक ठरेल असे आपल्या आदेशात लिहिले आहे.
यापुर्वी कांही पोलीस परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांनी असे आदेश दिले होते. पण त्या आदेशांचा उपयोग फक्त त्या पोलीस परिक्षेत्रापुरताच मानला गेला होता. आता पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या आदेशावर शिक्का मोर्तब केल्याने राज्य भरातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना हे आदेश लागू होतील. ज्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना याचा आनंद होईल. पोलीस महासंचालक संजय पांडे हे नेहमीच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करतात हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.