क्राईम

स्थागुशामध्ये तोंडी आदेशाने कार्यरत फौजदाराने गुटखा पकडला

गुटखा बाळगणाऱ्या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेत तोंडी आदेशाने कार्यरत पोलीस उपनिरिक्षकाने 1 लाख 22 हजार 518 रुपयांचा गुटखा पकडून दमदार कामगिरी दाखवली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील दोन पोलीस अंमलदार पोलीस उपनिरिक्षक झाले. महेश कुलकर्णी हे पहिल्यांदा पोलीस उप निरिक्षक झाले. त्यांचे नियुक्ती जिल्ह्याचा कारभार सांभाळण्यासाठी नांदेडच्या पोलीस नियंत्रण कक्षात झाली. आपल्या सेवापटातील नोंदी शिल्लक राहिल्याने स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार परमेश्र्वर ठाणूसिंग चव्हाण यांची पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती उशीराने आली. पण त्यांना तोंडी आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेतच कार्यरत राहण्यासाठी आदेश मिळविण्यात यश आले.
जरी तोंडी आदेशाने डॉक्टर परमेश्र्वर ठाणूसिंह चव्हाण यांची नियुक्ती स्थानिक गुन्हा शाखेत झाली असली तरी त्यांनी आपली जुनी कामगिरी कायमच ठेवली.आता त्यात भर टाकत त्यांनी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास शांतीनगर भागात बिना परवाना, कायद्याने प्रतिबंधीत असलेला गुटखा पकडला. या गुटख्याची किंमत 1 लाख 22 हजार 518 रुपये आहे. पोलीस उपनिरिक्षक डॉक्टर परमेश्र्वर ठाणूसिंह चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 328, 188, 272, 273 आणि 26(2), 27, 23, 30(2)(अ) 59(4) या सह कलमांसह गुन्हा क्रमांक 220/2021 दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके अधिक तपास करीत आहेत.
पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार बाजीराव आणि मांडवकर यांनी बेकायदेशीरपणे गुटखा बाळगणाऱ्या शेख जावेद शेख एजाज (33), कादरखान असद खान (33) दोघे रा.कळमनुरी या दोघांना पकडले. त्यांची चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.38एफ 1087 जप्त करण्यात आली आहे. आज पोलीसांनी पकडलेल्या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *