नांदेड

दहा वर्षीय बालकाच्या मृत्यूसाठी जबादार डॉक्टरवर कार्यवाही कर-मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-दत्तनगरमधील केअर हॉस्पीटलच्या चुकीच्या उपचारामुळेच दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.याबाबत भाजपचे महनगराध्यक्ष प्रविण साले आणि वजिराबाद येथील मंडळाध्यक्ष हरजनसिंघ पुजारी यांनी एक निवेदन देवून त्या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत डॉक्टर आणि त्या दवाखान्यातील स्टॉफ विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
               २१ ऑगस्ट रोजी शहरातील खालसा कॉलनी, गवळीपुरा येथील रहिवाशी दिलबागसिंघ गुलाबसिंघ कंधारवाले यांचा १० वर्षीय बालक जसराजसिंघ यांच्यावर  उपचार सुरू असतांना त्याला हैद्राबादला नेण्यासाठी सांगितले आणि कांही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.याबाबत अनेक निवेदने देण्यात आली असून केअर हॉस्पीटलमधील डॉ.संदीप बोखारे आणि त्यांच्या स्टॉफविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आज भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले आणि वजिराबादचे मंडळ अध्यक्ष हरबजनसिंघ पुजारी यांच्या स्वाक्षरीचे एक निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह अनेकांना देण्यात आले आहे. हे निवदेन देतांना नवल पोकर्णा, दिलीपसिंघ सोढी आणि अनेक कार्यकर्ते हजर होते.
डॉ.संदीप बोखारे यांचा दवाखाना कायम बंद करावा अशी विनंती या निवेदनात आहे. अन्यथा भारतीय जनता पक्षाकडून लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमुद आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *