नांदेड

गोदावरी, पैनगंगा पुर्णा, मनार आदी नदीकाठी लोकांनी सतर्क राहा

गोदावरी नदीची धोका पातळी आता येवून ठेपली आहे; नदीत तयार होणारा पाण्याचा फुगवटा त्रासदायक ठरू शकतो 
नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीच्या पात्रात पाणी विसर्ग करणाऱ्या अनेक प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे सर्व पाणी तेलंगणातील पोचमपाड धरणातून पुढे जाते. पोचमपाड धरणाचे दरवाजे सुध्दा उघडले आहेत. तरीपण गोदावरी नदीपात्रात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता नदी पात्रात फुगवटा तयार होणार आहे. त्यामुळे गोदावरी, पैनगंगा पुर्णा, मनार आदी नद्यांच्या काठी राहणाऱ्या नागरीकांनी आजची रात्र वैराची आहे. असे समजून सतर्क राहण्याची गरज आहे. या संदर्भाने पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एस.के.सब्बीनवार यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केली आहे.
                   7 सप्टेंबरच्या सायंकाळी 5 वाजता निम्न दुधना प्रकल्पातून 4320 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीपात्रात सुरू आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 97000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पुर्णा  प्रकल्पाच्या(येलदरी व सिध्देश्र्वर) पाणलोट क्षेत्रातून पुर्णा नदीत 6242 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सिध्देश्र्वर धरणाच्या खाली मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा पुलाजवळ 76000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीत मिळते. पाणलोट क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने विसर्गात वाढ होत आहे. नांदेडच्याखाली तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण 100 टक्के भरलेले आहे. तेथून 306000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पोचमपाड धरण भरले असल्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा फुगवटा तयार होतो. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे.
                   विष्णुपूरी प्रकल्पातून 172300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक जास्त असली तरी विष्णुपूरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रीत करण्याचा प्रयत्न राहिल आणि पाण्याचा विसर्ग नियंत्रीत केला जाईल. पण हे सर्व निसर्गावर अवलंबून आहे. कारण पाऊस पडतच राहिला तर पाण्याच्या विसर्गात वाढ मोठ्या प्रमाणात वाढ होईल. नांदेड शहरात देगलूर नाक्याजवळी पुलाजवळ पाण्याची पातळी 351.10 मिटर आहे. धोकापातळी 354 मिटर आहे. धोका पातळीचा विसर्ग 309774 क्युसेक्स असतो.
          उर्ध्व मनार प्रकल्प व निम्म मनार प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. उर्ध्व मनार प्रकल्पातून आज सायंकाळी 25000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प 91 टक्के भरले आहे. तेथेही गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. या सर्व परिस्थितीत गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मनार या नद्यांच्या काठी असलेल्या गावातील नागरीकांनी अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. वेळोवेळी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाणी विसर्गाची माहिती जनसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षातून मिळू शकेल. त्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-263870 असा आहे.
नांदेड शहरात पाण्याची पातळी जशी-जशी वाढत गेली. त्यानंतर सेल्फी बहाद्दरांची गर्दी नदीकाठी वाढत गेली. फोटो काढण्यात कोणाला कांही बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही.पण सेल्फीच्या नादात किंवा अतीधैर्य दाखविण्याच्या नादात अनेकांचे जीव गेले आहेत. त्या बातम्या सुध्दा आम्ही लिहिलेल्या आहेत. प्रशासन आपल्यावतीने प्रत्येक व्यक्तीचा जीव सुखरुप राहावा यासाठी प्रयत्नशिल आहे. पण त्यांच्या प्रयत्नाना साथ देण्याची आमची जबाबदारी आहे. तेेंव्हा आम्ही सर्वांना नम्र विनंती करू इच्छीतो पाण्याच्या जवळ जाण्यापेक्षा त्यापासून दुर राहा सर्वांना सुरक्षीत ठेवा आपल्या स्वत:ची काळजी घ्या आणि सुरक्षीत राहा.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *