नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात विधान मंडळ अंदाज समितीचा 6 ते 8 सप्टेंबर हा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. या पत्रावर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांची स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा या बाबत पत्र निर्गमित करतांना सचिवालयाचे पाच जुने संदर्भ या पत्रात जोडण्यात आले आहेत. आजपासूनच नांदेड जिल्ह्यात दोन दिवस पीआरसी समितीचा दौरा सुरू आहे. पुढे विधान मंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा 6 ते 8 सप्टेंबर 2021 या कालखंडात नियोजित होता. पण आता हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती 1 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रातून समोर आली. या दौऱ्याची पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल असेही यात कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांचे प्रधान सचिव, अनेक उपसचिव आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना या पत्राच्या प्रति अग्रेशित करण्यात आल्या आहेत.
