

नांदेड(प्रतिनिधी)-29 मार्च रोजी झालेल्या घटनाक्रमातील गुन्हा क्रमांक 113 मध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन. गौतम यांनी 2 आरोपींना जामीन दिला आहे.
गुरूद्वारा जवळ 29 मार्च रोजी घडलेल्या घटनेनंतर 3 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. प्रत्येक गुन्ह्यात भारतीय दंडसंहितेची कलम 307 ही अंर्तभुत करण्यात आली होती. आता जवळपास दीडशे दिवस झाले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये पकडलेले अनेक आरोपी तुरूंगात आहेत. त्यापुर्वी दोन जणांना न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामीन दिला होता. त्याच पध्दतीने सत्र खटला क्रमांक 161 मधील दोन जणांनी पुन्हा जामीन मागितला. त्यांची नावे अमरजितसिंघ उर्फ राजू बसंतसिंघ महाजन आणि मनजिंदरसिंघ उर्फ मनिंदरसिंघ जसपालसिंघ लांगरी अशी आहेत. या दोघांच्यावतीने ऍड.आर.व्ही.कांबळे आणि ऍड.अमनपालसिंघ कामठेकर यांनी बाजू मांडली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश ए.एन.गौतम यांनी या गुन्ह्यातील फिर्यादींना किरकोळ मार लागलेला आहे. जामीन मागणाऱ्या दोघांच्या हातात शस्त्र होते असे कुठेच दिसत नाहीत अशी नोंद आपल्या निकाल पत्रात करून दोघांना जामीन मंजूर केला आहे.