महाराष्ट्र

2 ते 4 सप्टेंबर पीआरसी समिती नांदेडच्या दौऱ्यावर

नांदेड(प्रतिनिधी)-2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर या दोन दिवसांसाठी पंचायत राज समिती नांदेड जिल्ह्यात भेट देणार आहे. या समितीमध्ये एकूण 31 आमदारांचा समावेश आहे. त्या 31 मध्ये 7 निमंत्रीत सदस्य आहेत.
महाराष्ट्र विधान मंडळातील पंचायत राज समिती (पीआरसी) चा दौरा नांदेडसाठी 2, 3 व 4 सप्टेंबर 2021 रोजी निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील विधानमंडळ सदस्यांसोबत चर्चा होणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांसोबत चर्चा होणार आहे. जिल्हा परिषदेचा लेखा परिक्षा पुर्नविलोकन अहवाल सन 2016, 2017  यासाठी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची साक्ष होणार आहे. सोबतच पंचायत राज समिती ठरवेल त्या ग्राम पंचायत समितींच्या भेटी ठरवल्या जातील. जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, ग्राम पंचायत भेटी होतील. गटविकास अधिकारी व संबंधीत अधिकाऱ्यांची या संदर्भाने साक्ष होईल.
या समितीमध्ये पीआरसी प्रमुख आ.संजय रायमुलकर हे आहेत. सोबतच पीआरसी समितीतील सदस्य आ.प्रदीप जयस्वाल, आ.कैलास पाटील, आ.डॉ.राहुल वैधप्रकाश पाटील, आ.अनिल भाईदास पाटील, आ.संग्राम अरुणकाका जगताप, आ.दिलीपराव शंकरराव बनकर, आ.शेखर गोविंदराव निकम, आ.सुभाष रामचंद्रराव धोटे, आ.माधवराव निवृत्तीराव जवळगावकर, आ.प्रतिभा सुरेश धानोरकर, आ.हरीभाऊ किशनराव बागडे, आ.विजयकुमार कृष्णराव गावीत, आ.डॉ.देवराव मादगुजी होळी, आ.कृष्णा धमाजी गजबे, आ.राणा जगजितसिंह पदमसिंह पाटील, आ.प्रशांत बन्सीलाल बंब, आ.मेघना दिपक बोर्डीकर-साकोरे, आ.किशोर गजानन जोरगेवार, आ.अंबादास दानवे, आ.विक्रम काळे, आ.अमरनाथ राजूरकर, आ.निरंजन डावखरे, आ.सुरेश दस असे 24 आमदार आहेत. तसेच निमंत्रीत आमदारांमध्ये आ.किशोर अप्पा पाटील, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील, आ.किशोर दराडे, आ.रत्नाकर गुट्टे, आ.महादेव जानकर आणि सदाशिव रामचंद्र खोत यांचा समावेश आहे.
पीआरसी कमिटीचा कार्यक्रम दि.2 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह आणि जिल्हा परिषद सभागृह येथे आहे. 3 सप्टेंबर रोजी विविध जागी भेटी होतील आणि त्यानंतर 4 सप्टेंबरचा कार्यक्रम जिल्हा परिषद सभागृह नाशिक असा दाखविण्यात आला आहे.
या पार्श्र्वभूमिवर नांदेडचे शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि सर्व पंचायत समित्या यांना एक पत्र दिले असून 6 पानांवर शाळेच्या संदर्भाने काय तयारी करायला हवी असे या पत्रात सांगितले आहे. ज्यामध्ये पीआरसी दौरा संपेपर्यंत कोणालाही रजा मिळणार नाही. सर्वांनी मुख्यालयी उपस्थित राहायचे आहे. शाळेतील विविध अभिलेखे तयार ठेवायचे आहेत. शाळेतील प्रत्येक घटकाची स्वच्छता दिसली पाहिजे. शालेय पोषण आहाराचा हिशोब व्यवस्थीत असला पाहिजे. असे विविध काम त्यात सांगण्यात आले आहेत.
पीआरसीला भरपूर मोठे अधिकार असतात त्यांनी घेतलेला निर्णय कोणीच बदलू शकत नाही. यामुळे पीआरसी समितीचा दौरा हा जिल्ह्यातील कारभाराच्या पारदर्शकतेसाठी महत्वपूर्ण मानला जातो.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.