क्राईम

श्री क्षत्रीय समाज रेणुकामाता मंदिरात 47 लाखांच्या अपहार प्रकरणी तीन माजी विश्र्वस्तांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रेणुका माता मंदिर संस्थेत 47 लाखांचा अपहार करणाऱ्या तीन विश्र्वस्तांना अटक करण्यात आली. आज 31 ऑगस्ट रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी या तीघांना तीन दिवस, 2 सप्टेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील एक वकील विश्र्वस्त अद्याप पोलीसांना सापडले नाहीत.
गणेशसिंह हनुमानसिंह ठाकूर यांनी नांदेडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. की, शहरातील गाडीपुराभागात असलेल्या श्रीक्षेत्रीय समाज रेणुकामाता मंदिराच्या विश्र्वस्तांनी आपल्या फायद्यासाठी 47 लाख 9 हजार 575 रुपयांचा अपफार केला आहे. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानुसार न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) प्रमाणे इतवारा पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून इतवारा पोलीसांनी बिरजूसिंह भिक्कमसिंह गहेरवार (55), बद्रीसिंह दगडूसिंह कात्री (55), ऍड.जोधासिंह शंकरसिंह गहिलोत(64) आणि भिमसिंह हनुमानसिंह कौशीक (58) या चार जणांच्या विरोधात गुन्हा क्रमंाक 337/2020 कलम 405, 408, 409, 198, 200, 420, 464, 468 आणि 43 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला .
या प्रकरणात फौजदारी अर्ज क्रमांक 795/2020 आणि 796/2020 दाखल करून या चार विश्र्वस्तांनी अटकपुर्व जामीन मागितला होता.फेबु्रवारी 2021 मध्ये जिल्हा न्यायालय नांदेड यांनी त्यांना अटकपुर्व जामीन नाकारला होता. 2020 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यातील 3 विश्र्वस्त बिरजूसिंह भिक्कमसिंह गहेरवार (55), बद्रीसिंह दगडूसिंह कात्री (55)  आणि भिमसिंह हनुमानसिंह कौशीक (58) यांना पोलीसांनी पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात अटक केली. आज दि.31 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार कलंदर, मांडवकर, पवार, हंबर्डे आणि जिनेवाड यांनी  अटक केलेल्या तीन विश्र्वस्तांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलीसांनी  मांडलेले मुद्दे लक्षात घेवून न्या.प्रविण कुलकर्णी यांनी रेणुका माता मंदिरच्या अटक केलेल्या तीन विश्र्वस्थांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *