नांदेड

विष्णुपूरी धरणाचे दोन गेट उघडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरानजीक असलेल्या विष्णुपूरी जलाशयातील दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 942 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
मागील दोन दिवसापासून विष्णुपूरी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला आहे. त्यामुळे विष्णुपूरी धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. 31 ऑगस्ट रोजीची विष्णुपूरी धरणातील पाण्याची पातळी 355 मिटर एवढी झाली आहे. म्हणजे विष्णुपूरी प्रकल्प 100 टक्के भरले आहे. त्यामुळे आज गेट क्रमांक 5 आणि 4 उघडण्यात आले असून त्यातून 942 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *