

नांदेड(प्रतिनिधी)-एक चार चाकी गाडी अंबाडी ता.किनवट घाटात झाडावर आदळल्याने एका सेवानिवृत्त वनअधिकाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला असून त्यांची दोन मुली गंभीर जखमी आहेत. ही घटना सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेत घडली.
किनवट येथील सेवानिवृत्त असलेले वन अधिकारी तथा गोदावरी अर्बन बॅंकेचे सल्लागार नारायण सट्टन्ना कटकमवार (64) हे सोमवारी सकाळी आपल्या पायाच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी आदिलाबादकडे जात असतांना अचानक त्यांची गाडी एका झाडावर आदळली. गाडीच्या समोरचा भाग या अपघात चक्काचुर झाला आहे. या अपघाच्यावेळी या गाडीत कट्टकमवार यांची मुले योगेश व महेश हे सुध्दा होते. अपघातात नारायण कट्टकमवार यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला. याच मार्गावरून येणाऱ्या एका शिक्षकाने जखमींना आपल्या गाडीत घेवून त्यांना उपचारासाठी किनवट येथे आणले. उपचारादरम्यान नारायण कटकमवार यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती देण्यात आली आहे. कटकमवार यांच्या छातीतील सापळ्या तुटून फुफूसांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. या अपघातात त्यांची दोन मुले योगेश आणि महेश यांना पुढील उपचारासाठी आदिलाबादकडे पाठविण्यात आले आहे. किनवट परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नारायण कटमवार यांच्या परिवारात दोन मुले, एक मुलगी, पत्नी, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे.