नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा चार वर्षाचा कार्यकाळ खंडीत असतांना न्यायालयातील लढाई जिंकल्यानंतर त्या कार्यकाळाबाबत 15 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा असे आदेश नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी दिल्यानंतर सुध्दा 90 दिवस संपले असतांना अद्याप पोलीस अधिक्षक कार्यालयातून या प्रकरणाचा निर्णय झालेला नाही.
शेख मुक्तार शेख नुरअली हे पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले. ते 1984 मध्ये पोलीस दलात आले होते. त्यापुर्वीचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 171/1983 संदर्भाने पाठविण्यात आलेल्या अहवालामुळे शेख मुक्तार यांना सेवेतून 1985 मध्ये कमी करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने 1989 मध्ये त्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती दिली. त्यानंतर कायदेशीर लढाई शेख मुक्तार यांनी जिंकली. पण या कालावधीत लागणारा वेळ तो वेळच होता. पुढे आपल्या वयोमानानुसार त्यांची सेवानिवृत्ती झाली.
पण आपली सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुध्दा 1985 ते 1989 या अखंडीत सेवा कालासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. 25 फेबु्रवारी 2021 रोजी गृहविभागाचे कक्ष अधिकारी ऋषीराज कदम यांनी विशेष पोलीस महानिरिक्षक नांदेड यांना पत्र पाठवून शेख मुक्तारचा खंडीत कालावधी नियमित करण्याची सुचना केली होती. या पत्रानंतर 25 मे 2021 रोजी हा निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981मधील नियम क्रमांक 70 प्रमाणे सेवेत घेणारे सक्षम अधिकारी सेवाबाह्य कालावधीचा निर्णय घेवू शकतात. म्हणून पोलीस अधिक्षक नांदेड यांनी या प्रकरणाचा निर्णय घेवून तसे संबंधीताला कळवावे असे पत्र दिले होते. निसार तांबोळी यांनी दिलेल्या पत्रात 15 दिवसांची मुदत असतांना आता 90 दिवस उलटले आहेत. तरीपण शेख मुक्तार शेख नुर अली यांचा खंडीत कार्यकाळ नियमित करण्याचे आदेश झालेल नाहीत तो निर्णय पोलीस अधिक्षक नांदेड यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे.
