क्राईम

सांगवी येथे घरफोडून 1 लाख 64 हजारांची चोरी ; इतर तीन चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-त्रिरत्ननगर सांगवी येथील एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 64 हजार 67 रुपयांचा ऐवज चोरला आहे. देगलूर येथून एक आणि महाविर चौक नांदेड येथून अशा 65 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. एका विद्यार्थींनीच्या बॅगमधील 6 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरण्यात आला आहे. या सर्व चार घटनांमध्ये एकूण 2 लाख 35 हजार 67 रुपयांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
सुवर्णा बालाजी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते 26 ऑगस्टच्या पहाटे 8 वाजेदरम्यान त्यांचे त्रिरत्ननगर सांगवी येथील घरफोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रुपये असा एकूण 1 लाख 64 हजार 67 रुपयांचा ऐवज चोरला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रेडेकर अधिक तपास करीत आहेत.
सायबू गंगाराम सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास त्यांनी चिंतरवार हॉस्पीटल देगलूर येथे उभी केलेली 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एम.3662 ही चोरीला गेली आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सरोदे अधिक तपास करीत आहेत.
महाविर चौक, हनुमान मंदिर नांदेड जवळ पुष्पलता दत्तात्रय दंडेवाड यांनी 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.पी.4108 उभी केली होती. दीड तासाच्या अंतरात रात्री 8.30 वाजेदरम्यान ही 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार उत्तकर हे अधिक तपास करीत आहेत.
वैष्णवी रमेशराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास त्या बसमध्ये प्रवेश करत असतांना त्यांच्या पाठीवरील कॉलेज बॅगमध्ये ठेवलेला 6 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरला आहे.वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार वाजेद अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *