क्राईम

भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी पकडला गुटख्याचा कंटेनर

नांदेड(प्रतिनिधी) -भोकर मार्ग हिमायतनगर येथे चक्क कंटेनर भरून वाहतूक होणारा गुटखा अंदाजे ३५ लाखाचा भोकर पोलिसांनी दि.२७ आँगस्टच्या पहाटे ४ च्या सुमारास जप्त केल्याची घटना घडल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात गुटखा बंदी असतांना अन्नभेसळ विभाग व पोलीसांच्या सहकार्याने सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री होतानाचे निदर्शनास येत आहे. तेलंगणा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची खरेदी करून गुटखा माफीया शहरासह खेड्यापाड्यात गुटख्याचा पुरवठा करत आहेत. गुटखा विक्री करून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करत नवीन पिढीला व्यसनाधीनतेत गुटखा माफिया जखडत आहेत. भोकरहुन हिमायतनगरकडे जाणारा टि.एच.आर.५५ यू,७०५४ क्रमांकाचा कंटेनर सकाळी ४ च्या दरम्यान भोकर पोलीसांच्या निदर्शनास आला. सदर कंटेनर चालकाची चौकशी केली असता पोलीसांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कंटेनरची तपासणी केली असता संपूर्ण कंटेनर विविध कंपनीच्या गुटख्याच्या पुड्याने भरलेला निदर्शनास आल्याने सदर कंटेनर जप्त केला. पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. अनिल कांबळे यांनी ही साहसपूर्ण कामगिरी बजावली. अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी आल्यानंतरच नेमकी गुटख्याची किंमत ठरणार असून उपलब्ध साठ्यावरुन अंदाजे ३५ लाखाचा गुटखा व २५ लाखाचा कंटेनर असे ६० लाखाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई उशीरापर्यंत सुरू होती.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *