महाराष्ट्र

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील १२४ पोलीस अंमलदारांना दिली पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती; नांदेड जिल्ह्यातील सहा पोलीस अंमलदारांचा समावेश

नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील १२४ पोलीस अंमदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मान्यतेने आस्थापना विभागातील अपर पोलीस महासंचालक कुलवंत.कु.सारंगल यांनी जारी केले आहेत.
२७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या एका पत्रकात पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस उपनिरीक्षक पदाची महसूल विभागनिहाय रिक्त पदांची संख्या लक्षात घेवून सध्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नती कक्षेत असलेल्या १२४ पोलीस अंमदारांची यादी राज्यभरातील पोलीस घटक प्रमुखांना पाठविली आहे. यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील आणि विभागातील पोलीस घटक प्रमुखांनी यासंदर्भाची संपूर्ण माहिती जमा करुन, संबंधित पोलीस अंमलदारांकडून बंधपत्र लिहून द्यायचे आहेत. पदोन्नती ज्यांना दिली जाणार आहे त्यांचा सेवा कालावधी पूर्ण होण्यासाठी तीन वर्ष पर्यंत सेवा शिल्लक असावी असे या बंधपत्रात लिहिले आहे.
विभागीय महसुली संवर्गनिहाय पोलीस उपनिरीक्षकांची रिक्त पदांची सद्यस्थिती पुढीप्रमाणे आहे. नागपूर-३२५, अमरावती-८९, औरंगाबाद-४९, कोकण १-१५६, कोकण २-१५११, नाशिक-१०३, पुणे-१८३ अशी एकूण २४१६ पदे रिक्त आहेत. तरी पण पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नती कक्षेत फक्त १२४ पोलीस अंमदारांची यादी संचालक कार्यालयाने जारी केली आहे. ज्यामध्ये मुंबई शहर-९०, अमरावती शहर-३, अमरावती ग्रामीण-४, यवतमाळ-१, वाशिम-१, परभणी-१, ठाणे शहर-१, पुणे शहर-१, अकोला-३, नाशिक शहर-५, नाशिक ग्रामीण-१, जालना-१ आणि नांदेड-६ अशी १२४ पोलीस अंमदाराची नावे या यादीत आहेत. नांदेडमधील पोलीस हवालदार महेमूद मौलाना सय्यद बकल नं.५६९, संजयकुमार तुकाराम गायकवाड बक्कल नं.४२६, दिलीपकुमार निवृत्तीराव वाघमारे बक्कल नं.१२२६, सय्यद अब्बास मोहंमद बक्कल नं.१५०६, प्रकाश केरबा पाईकराव बक्कल नं.१११८ आणि सुदाम एकनाथ कांबळे बक्कल नं.१२६७ अशा सहा पोलीस अंमलदारांची नावे या यादीत आहेत.
पोलीस महासंचालक संजय पांडे हे पोलीस अंमदाराच्या लवकरात लवकर पदोन्नतीसाठी बरीच मेहनत घेत आहेत. त्यातूनच पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्याची यादी काढण्यात आली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *