महाराष्ट्र

​ पोलीस कल्याणासाठी संजय पांडे यांनी शासनाकडे पाठवला प्रस्ताव

नैमित्तीक रजा 12 ऐवजी 20 करण्याची मागणी
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यभरातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना एका कॅलेंडर वर्षातील 12 नैमित्तीक रजा 20 कराव्यात असा प्रस्ताव अपर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन गृहविभाग यांना पाठवला आहे. पोलीस महासंचालकांच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर राज्यातील पोलीस दल त्यांचे उपकार विसरणार नाहीत.
राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना एका कॅलेंडर वर्षात 12 दिवस नैमित्तीक रजा मिळते. या बाबत या रजा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवतांना पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दल वगळून इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा आहे. तसेच कामकाजाची वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी 8 तास 30 मिनिटे निश्चित करण्यात आली आहे. पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना आठवड्यातून फक्त एकच साप्ताहिक सुट्टी मिळते. तसेच कामकाजाचा व्याप जास्त असल्यामुळे दररोज 8.30 तासांपेक्षा जास्तवेळ थांबू कर्तव्य पार पाडावे लागते. सोबतच बंदोबस्त जसे गणपती, नवरात्र, ईद, व्हीआयपी आणि इतर अनेक आंदोलने, मोर्चे आदींच्यावेळेत नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ कर्तव्यावर हजर राहावे लागते. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एका कॅलेंडर वर्षात साधारणत: 20 ते 22 दिवस शासकीय व सार्वजनिक सुट्या पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदारांना मिळत नाहीत. सततच्या कामकाजामुळे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांवर शारिरीक व मानसिक तणाव येवून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. परिणामी त्यांची कार्यक्षमता कमी होते. पोलीस आपल्या कुटूंबाला पुरेसा वेळ देत नाहीत त्यामुळे कुटूंबाकडे दुर्लक्ष होते आणि कुटूंबात अस्थिरता निर्माण होते.
महाराष्ट्र शासनाने दि.23 मार्च 2000 नुसार एका कॅलेंडर वर्षात पोलीसांना 12 नैमित्तीक रजा दिल्या आहेत. या नैमित्तीक रजांमध्ये वाढ केली तर पोलीसांचे मानसीक स्थैर्य वाढेल. आणि त्यांची कार्यक्षमता जास्त ताकतीने पुढे येईल. त्यामुळे राज्य पोलीस विभागातील पोलीस निरिक्षक ते पोलीस अंमलदार यांना एका कॅलेंडर वर्षात 12 दिवसांच्या नैमित्तीक रजा आता 20 दिवसांच्या कराव्यात आणि असे शासन निर्णय निर्गमित करावेत असा हा प्रस्ताव आहे.
पोलीस महासंचालकांनी पाठवलेला हा प्रस्ताव मंजुर झाला तर राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना आनंद होईल आणि सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केलेले हे प्रयत्न आणि त्यांच्यासाठी मिळवून दिलेल्या सुविधा ते विसरणार नाहीत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.