नांदेड(प्रतिनिधी)-भोकरचे कर्तव्यदक्ष अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी माझ्या 13 लाखाच्या चोरी प्रकरणाचा तपास लावणारच असल्याचे आपल्याला सांगितले ही माहिती सिरंजनी ता.हिमायतनगर येथील अविनाश शंकर संगनवार यांनी दिली.
आज दि.26 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात अविनाश शंकर संगनवार यांची भेट झाली. त्यांनी आज पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवक विभागामध्ये दिलेला अर्ज आम्हाला दिला. दि.9 जून 2021 रोजी पाऊस पडत असल्याने मी माझ्या दुकानातील रोख रक्कम हिमायतनगर येथील शंकर ट्रेडींग कंपनी या दुकानातच ठेवून तशाच सिरंजनी येथे गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मला फोन आला त्यावरून मी येवून तपासणी केली असता माझ्या दुकानातील रोख रक्कम चोरीला गेली होती. त्यावेळी तक्रारीत 4 लाख 95 हजार रुपये लिहिले होते. पण प्रत्यक्षात माझे 13 लाख रुपये गेले आहेत. या अगोदर सुध्दा दोन वर्षापुर्वी मी दुकान बंद करून घरी जात असतांना रस्त्यात अडवून मला मारहाण करून 90 हजारांची लुट झाली होती. त्याचाही शोध अद्याप लागला नाही असे या अर्जात लिहिलेेले आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालयात अविनाश संगनवार यांनी आम्हा सीसीटीव्ही फुटेज सुध्दा दिले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका कॅमेऱ्यात चार लोक जात असल्याचे दिसतात. त्यानंतर शंकर ट्रेडींग कंपनीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक जण आत येतो. थेट ड्राव्हर उघडण्याचा प्रयत्न करतो पण त्याला यश येत नाही म्हणून तो संपूर्ण टेबलच शटरच्या बाहेर काढतो त्याची इतर मंडळी तो टेबल ओढून घेतात असे दिसते. अत्यंत कडक शिस्तीचे, इमानदार, कर्तव्यनिष्ठ भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांची भेट झाल्याची माहिती सुध्दा दिली. त्यांनी माझ्यासमोरच हिमायतनगर पोलीसांना फोन लावून या प्रकरणातील गुन्हेगार पकडलेच पाहिजेत असे सांगितले. ही माहिती अविनाश संगनवार यांनी आमच्यासोबत प्रत्यक्ष भेटी दरम्यान दिली. या चोरीबाबत हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वृत्तमानपत्रांना दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाच्या बातम्या पण दाखवल्या. आणि भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्यावर माझा गुन्हा उघडकीस आणतील आणि माझे 13 लाख रुपये परत मिळवून देतील असा मला विश्र्वास असलयाचे अविनाश संगनवार म्हणाले.
