क्राईम

एसटी चालकाला मारहाण करणाऱ्या ऑटो चालकाची न्यायालयाने केली मुक्तता

नांदेड (प्रतिनिधी)- सन 2012 मध्ये एका एसटी चालकाला मारहाण करणाऱ्या ऑटो चालकाची मुक्तता 9 वर्षांनंतर झाली आहे. हा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी. खोसे यांनी जाहीर केला.
दि. 24 मे 2012 रोजी सायंकाळी 5 वाजता एसटी चालक गोविंद जयराम यमुुलवाड हे एसटी क्र. एम.एच. 7 – 7246 घेऊन देगलूर नाका येथून जात असताना ऑटो क्र. एम.एच. 26 टी. 7860 चा चालक शेख मोसीन शेख चॉंद (20) यासोबत वादावादी झाली. या वादात शेख मोसीन शेख चॉंदने एसटी चालक गोविंद यमुलवाडला मारहाण केली. या भागात इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून इतवारा पोलिसांनी शेख मोसीन विरूद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले, त्या खटल्याचा क्र.44/2019 असा होता.
न्यायालयात या प्रकरणी चार साक्षीदारांना तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याआधारे या प्रकरणातील दोष सिद्ध करण्यासाठी पुरावा उपलब्ध नसल्याची नोंद आपल्या निकालात करून न्यायाधीश खोसे यांनी शेख मोसीन शेख चॉंदची मुक्तता केली. या खटल्यात शेख मोसीनची बाजू ऍड. महम्मद मोहीयोद्दीन यांनी मांडली होती.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.