नांदेड

उसाच्या दरात पाच रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार ?  -प्रल्हाद इंगोले

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा  
नांदेड (प्रतिनिधी )- केंद्र सरकारने उसाच्या एफआरपी (हमीभावात)प्रति क्विंटल पाच रुपयांची वाढ करून एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे केंद्र सरकारच्या अशा शेतकरीविरोधी धोरणांमुळे  २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न कस दुप्पट होणार असा संतप्त सवाल शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केला आहे.
        मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून  शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवून केवळ आकडेमोड करीत आहे  प्रत्यक्षात मात्र केंद्र सरकार हे सातत्याने शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकर्यांना आणखी दारिद्र्याच्या खाईतच नेण्याचं काम करीत आहे .  उसाचा दर ठरवण्याचा बेस नऊ टक्क्यांवरून साडेनऊ टक्के केला यामुळे दीडशे रुपये कमी एफआरपी निघतो . गतवर्षी तर केंद्र सरकारने एफआरपी दरात कसलीही वाढ केली नव्हती यावर्षी केवळ पाच रुपयांची वाढ करून शेतकर्यांची  थट्टा केली आहे. खते, बी -बियाणे, पाणी, वीज, डिझेल, मजूरी यांच्या किमती वर्षांला वीस पंचवीस टक्के वाढत असताना केंद्र सरकारने शेतकर्यांचा कसल्याही प्रकारचा विचार न करता केवळ पाच रुपये प्रति क्विंटलला वाढ करून शेतक-यांचा मोठा अपमान केला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक  कंबरडे मोडणार असून येणार्या काळात भाजपला याचे परिणाम निवडणुकीच्या माध्यमातून दिसतील . २०२२ पर्यंत मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची  घोषणा जागोजागी करत आहे. केवळ कागदावरील आकडेमोड केल्याने शेतकर्यांचे उत्पन्न प्रत्यक्षात दुप्पट होणार नाही त्यासाठी सरकारला शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे लागतील .  शेतीच्या वाढत्या उत्पादन  खर्चानुसार शेतीमालाचे दरही नियमित वाढले पाहिजे . उसाच्या दरात प्रति क्विंटल किमान पन्नास रुपयांची वाढ होणे अपेक्षित असताना मोदी सरकारने मात्र केवळ पाच रुपयांची वाढ करून शेतकर्यांच्या एकप्रकारे विश्वासघातच  केला आहे. याचे परिणाम येणार्या निवडणुकांत देशातील शेतकरी केंद्र सरकारला निश्चितच दाखवून देईल  त्यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून ऊस दरात वाढ करावी अशी अपेक्षा शिवसेनेचे शेतकरी नेते  तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केली.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *