क्राईम

शिवाजीनगर पोलीसांनी महिलेच्या तक्रारीत कलमे कमी करण्याची किमया केली

नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सासरच्या जाचाला कंटाळल्याची तक्रार दिल्यानंतर त्या महिलेचे दोन बोट तुटले असतांना सुध्दा त्यात भारतीय दंड संहितेच्या कलम जोडण्यामध्ये दया दाखविण्यात आल्याचे त्या महिलेने काढलेल्या एक्स रे वरून दिसते.
दि.10 ऑगस्ट रोजी एका महिलेने आपल्या सासरवाडीतील लोकांविरुध्द पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली तेंव्हा गुन्हा क्रमांक 299/2021 कलम भारतीय दंड संहितेच्या 498(अ), 324, 323, 504, 506 आणि 34 नुसार दाखल करण्यात आला. 10 ऑगस्ट रोजी या महिलेची वैद्यकीय तपासणी शासकीय रुग्णालयात झाली. पण शासकीय रुग्णालयात एमएलसी तपासाचे कागदपत्र दिले जात नाहीत. म्हणून या महिलेने 12 ऑगस्ट रोजी एका खाजगी दवाखान्यात आपल्या डाव्या हाताचा एक्स रे काढला. त्यात मधले बोट आणि त्या शेजारचे बोट असे दोन बोट तुटले असल्याचे एक्स रे सांगतो. या संदर्भाने विधीज्ञांकडे विचारणा केली असता तक्रारदाराचे हाड तुटल्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 326 ची नोंद त्या गुन्ह्यात होणे आवश्यक आहे असे सांगितले. पोलीसांकडे सुध्दा शासकीय रुग्णालयाने आपला वैद्यकीय अहवाल दिला असेल त्यात सुध्दा ती दोन बोटे तुटलेली असतील तरीपण गुन्हा क्रमांक 299 मध्ये कलम 326 जोडण्यात आलेले नाही.
महिला आणि त्यांच्या सासरच्या मंंडळीतील घरगुती वाद मारहाणीच्या स्वरुपाने रस्त्यावर आला आणि त्याचा प्रकार असा घडला. 498 ची तक्रार देतांना त्या बरेच लोकांची नावे बळजबरी जोडली जातात असे पोलीस सांगत असतात. हे खरे असेल तरी या बाबत वैद्यकीय अहवाल पाहुन त्या तक्रारदाराचे समाधान व्हावे असे काम करणे पोलीसांकडून अपेक्षीत आहे. तरीपण शिवाजीनगर पोलीसांनी जन्मठेपेची शिक्षा असणारे कलम 326 या गुन्ह्यात का जोडले नाही देव जाणे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *