नांदेड

रंगीत पाणी पिण्याची सवय असणाऱ्या बोरु बहाद्दराला पोलीस अधिक्षक कार्यालयातील पत्रांची चिंता

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयातील कागदपत्रांची बोरु बहाद्दरांना झ ालेली चिंता हा एक मोठा विषय आहे. कोणी सुर्याजी पिसाळाने दिलेल्या पत्राचा आधार घेवून बातम्या छापल्या जात आहेत. सुर्याजी पिसाळने दिलेले पत्र गोपनिय नाही काय? ते या बोरु बहाद्दराला कसे कळले हा एक नवीन प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालयात विनाकारण ठाणड मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अंकुश लागणार अशा आशयाची बातमी एका बोरु बहाद्दराने प्रसिध्द केली. त्यामध्ये पोलीस अधिक्षक कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यामुळे गोपनिय कागदपत्रे जाहिर होत आहेत असे लिहिलेले आहे. कोणतेही काम नसलेल्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा वावर कमी व्हावा या उद्देशाने नांदेड जिल्ह्यातील सुर्याजी पिसाळाने पोलीस अधिक्षकांना एक पत्र लिहिल्याचा उल्लेख या बातमीत आहे.
रंगीत पाणी पिण्याच्या सवयीचा असलेला हा बोरु बहाद्दर बातमी कशी लिहावी याची जाण नसतांना कागदपत्र चाळली जातात असे वृत्तात लिहितो. शोध पत्रकारीता आणि त्याचा अर्थ माहित नसलेल्या या बोरु बहाद्दराने कोणाच्या तरी सांगण्याने किंवा भारीचे रंगीत पाणी पिल्याने या बातमीची चर्चा पत्रकारांमध्ये सुध्दा व्हायला लागली आहे. बोरु बहाद्दरालाच पत्रकार विचारत आहेत कोठे बसले होते महाराज.
ज्या सुर्याजी पिसाळाच्या नावाने त्याने पोलीस अधिक्षकांना पत्र दिल्याचे शब्द लिहिलेले आहे. ते पत्र या रंगीत पाणी बहाद्दर पत्रकाराच्या हाताला कसे लागले, ते पत्र गोपनिय नाही काय? याची जाण बातमी लिहितांना या बोरु बहाद्दराला आली नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.